Chandrakant Khaire Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Chandrakant Khaire : खोक्यांचा वाद कोर्टात गेल्यास शिंदे गट अडचणीत येईल; चंद्रकांत खैरे काय म्हणाले? वाचा...

राज्याच्या राजकारणात 50 खोक्यांवरून सुरू झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chandrakant Khaire News : राज्याच्या राजकारणात 50 खोक्यांवरून सुरू झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा देखील शिंदे गटाने दिला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. खोक्यांचा वाद शिंदे गटाने कोर्टात नेल्यास यामध्ये शिंदे गटच अडचणीत येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. तसेच शिवतारेंना काही माहिती नाही, ते ज्युनिअर आहेत, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

मागील काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ५० खोक्यांवरून चांगलाच वाद पेटला आहे. शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातोय. यावरून अनेकदा शिंदे गटातील नेते आणि विरोधक आमने-सामने आले. आता तर थेट हा वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

आपल्यावर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिला आहे. इतकंच नाही तर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू, असा इशाराही शिंदे गटाने दिला आहे.

पुरावे द्या, दुध का दुध पाणी का होईल'

पहिल्या दिवसांपासून आम्ही आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्या लोकांना सांगतो आहे. तुम्ही खोके घेतल्याचे पुरावे द्या, तुम्ही सिद्ध करा, कुणी खोके घेतले. कसे खोके घेतले. आम्ही आज ४ महिने होत आले हे आव्हान त्यांना देतो आहे, पण ते (विरोधक) स्वीकारत नाहीत. केवळ आम्हाला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न करता आहे, असं शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात साम टीव्हीसोबत बोलत होते. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT