जालन्यात पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून शिवसेना-भाजप वाद
फलकावर नाव नसल्याने शिवसैनिकांनी काळ फासलं
अर्जुन खोतकरांकडून फलकाला काळ फासणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार केला.
निवडणुकीआधीच महायुतीत मतभेद उफाळले.
अक्षय शिंदे, साम टीव्ही
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीतील शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. पीआरकार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला. याच फलकाला काळ फासणाऱ्या शिवसैनिकांचा अर्जुन खोतकारांकडून सत्कार करण्यात आला. त्यानंतर कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच. त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांच्या मतदारसंघात आम्हाला घुसावं लागेल, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला.
जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावर काल रात्री आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव नव्हतं. त्यानंतर शिवसैनिकांनी तो नामफलक उघडून त्याला काळ फासलं होतं. त्यानंतर आज नामफलकाला काळ फासणाऱ्या शिवसैनिकांचा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सत्कार केला आहे. कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच, आम्हाला त्यांच्याही मतदारसंघात घुसावं लागेल, असा इशारा खोतकरांनी यावेळी दिला.
'आम्हालाही उद्घाटनाचे कार्यक्रम करावे लागतील, मग बघू कोण आडवं येतं. कोणी जर आम्ही आणलेल्या विकासकामाच्या आड येत असतील. तर ते कार्यक्रमाला येतील, पण पायावर सरळ जाऊ शकणार नाही, असं म्हणत अर्जुन खोतकर आक्रमक झाल्याचे दिसून आलं.
यावेळी त्यांनी स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांची दिशाभूल केल्याचा देखील आरोप केला. जालन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीतील शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये येणाऱ्या काळामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
जालन्यात महायुतीत वाद नेमका कशावरून झाला?
जालन्यातील पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.