Shivsena File Pic Saam Tv
महाराष्ट्र

Mahayuti: गृहमंत्री असेल तर शिवसेना वाचेल? गृहमंत्रिपदासाठी शिवसेनेचा आटापिटा?

Shivsena : निवडणूक निकालाच्या आठ दिवसानंतरही महायुतीचा सत्ता स्थापनेचा घोळ सुरुच आहे. गृहमंत्रालय हा कळीचा मुद्दा ठरलाय. शिवसेनेला सत्तेतलं दोन नंबरचं पद हवच आहे. मात्र भाजप ते सोडायला तयार नाही. शिंदे सेनेचा गृहखात्यासाठी एवढा अट्टहास का सुरु आहे? पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा बळकट झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना आपला मोर्चा गृहमंत्रिपदाकडे वळवलाय. त्यामुळे महायुतीतला तिढा आणखी वाढला आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीच्या यशात आपलाही वाटा असल्याचे एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे.

याच बळावर एकनाथ शिंदे यांनी गृह, महसूल आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गृह खाते कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाहीत. परंतु, एकनाथ शिंदे आपल्या मागणीवर ठाम आहेत. शिंदे का अडलेत गृहमंत्रीपदासाठी त्याची काही कारणं आहेत ते पाहूयात.

मुख्यमंत्रिपदानंतर गृहखातं हे सरकारमधलं दोन नंबरचं मंत्रिपद

मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असल्यास आणि अजित पवार अर्थमंत्री झाल्यास ते दोन नंबरवर असणार

गृहखातं न मिळाल्यास एकनाथ शिंदे थेट 3 नंबरवर जाणार

आगामी महापालिका, झेडपी निवडणुकांच्या दृष्टीनं गृह खातं शिवसेनेकडे ठेवण्याचा शिंदेंचा आग्रह

राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना पोलिस दलावर थेट नियंत्रण ठेवता येतं

गृहखात्यामुळे सर्वच पक्षांच्या हालचालींवरही बारीक नजर ठेवता येते

आमदारांची अनेक काम ही आपल्या मतदारसंघातल्या कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित असतात. आणि निवडणुकांमध्ये गृहखात्याचा याच्याशी थेट संबंध असतो. त्यामुळे गृहखात्यासाठी सत्तेतले सर्वच पक्ष आग्रही असतात. आणि शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद नसताना पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि मित्रपक्षांवरही वचक ठेवण्यासाठी गृहखातं गरजेचं वाटू लागलंय. त्यामुळे हा तिढा आता कसा सुटणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT