Mahayuti Government: मंत्रिपदासाठी आता नवे पात्रता निकष; आमदारांची वाढली धाकधूक

Mahayuti Government: मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम असला तरी मंत्रिपदासाठी अनेक आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरूवात केलीय. मात्र यावेळी मंत्रिपदाच्या निवडीचे नवे निकष ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Amit Shah
Mahayuti GovernmentBusiness Standard
Published On

अमित शाह सर्व संभाव्य मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार आहेत. त्यानुसार मंत्रिपदासाठी आमदारांची निवड केली जाणार आहे. नेमके काय आहेत निकष त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. महायुतीच्या सत्तास्थापनेसाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त ठरलाय. अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर झाला नसला, तरी देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय..

त्याआधीच मंत्रिपदासाठीही लॉबिंग सुरु झालंय.. मात्र इच्छुकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कसोटीला सामोरे जावे लागेल.. शाहांनी मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलंय.. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी साम टीव्हीला दिलीये. यासाठी काय निकष ठरवण्यात आलेत,पाहूया.

Amit Shah
NCP: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावांवर चर्चा; 'या' नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

मंत्रिपदासाठी निकष ठरले

वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी

आमदारांची कार्यक्षमता, वर्तणूक आणि इतिहास विचारात घेणार

लोकसभा निवडणुकीवेळची मतदार संघातली कामगिरी

मताधिक्य आणि आमदारांबाबतचं जनमतही विचारात घेणार

केंद्रीय नेतृत्त्व तसंच फडणवीस शिंदे आणि अजित पवार मेरिटवर मंत्रिपद देणार

जुने चेहरे टाळणार, कार्यक्षमतेच्या जोरावर नव्या चेहऱ्यांना संधी देणार

खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाचा निर्णयसुदधा याच मुद्यावर होणार

Amit Shah
Eknath Shinde: सत्ता स्थापनेआधी नवा ट्विस्ट येणार? शिवसेना खासदारांचा काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंना फोन कॉल

महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरुच आहे. गृहमंत्रीपदावरुनही शिंदे आणि भाजपत रस्सीखेच सुरुए. अशातच मंत्रीपदासाठीचे निकष महायुतीतील टेंशन अधिक वाढवणार की यातून भ्रष्टाचारमुक्त नव्या दमाचं,नवं सरकार राज्यात येणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com