shirur, zilla parishad member savita bagate, pabal pimpalvadi grampanchayat saam tv
महाराष्ट्र

Shirur News : शाळा दुरुस्तीच्या निधीतून बांधली स्मशानभूमी, जिल्हा परिषद सदस्याने अधिका-यांना घेतले फैलावर

मुलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार अधिका-यांनी केल्याचा आराेप महिला सदस्यांनी केला.

रोहिदास गाडगे

Shirur News : शाळा दुरुस्तीच्या पैशावर ग्रामपंचायतीने स्मशानभूमी बांधली आहे. हा प्रकार शिरुर तालुक्यातील पाबळच्या पिंपळवाडी येथे घडला आहे. मुलांच्या शिक्षणापेक्षा मेलेली माणसं महत्वाची वाटतात का असा सवाल जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे (zilla parishad member savita bagate) यांनी ग्रामपंचायतीस केला आहे. (Maharashtra News)

जिल्हा परिषद सदस्य बगाटे म्हणाल्या 14 व्या वित्त आयोग निधीतुन पाबळच्या पिंपळवाडी शाळेच्या दोन वर्गखोल्या मंजुर झाल्या. यासाठी निधी आला परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी शाळा दुरुस्ती करण्याऐवजी स्मशानभूमी बांधली.

मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांमध्ये चिमुकली मुलं जीव मुठीत धरुन शिक्षण घेतात याचं भाव गावक-यांनी ठेवायला हवं होतं असेही जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांवर आगपाखड केली.

जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटेंनी पाबळ ग्रामपंचायतीवर मुलांसह माेर्चा देखील काढला. मुलांच्या शिक्षणापेक्षा (education) मेलेली माणसं महत्वाची का असा सवालही बगाटे यांनी केला. बगाटे यांच्या आक्रमकतेपूढे ग्रामस्थ देखील निशब्द झाल्याचे पाहायला मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये ईद मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

SCROLL FOR NEXT