Shirpur News Fraud Case  Saam tv
महाराष्ट्र

Fraud: फ्लिपकार्टचा बनावट ग्राहक बनला; कंपनीलाच २७ लाखांचा गंडा

फ्लिपकार्टचा बनावट ग्राहक बनला; कंपनीलाच २७ लाखांचा गंडा

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : फ्लिपकार्ट ब्रँडकडे ग्राहकांचा बनावट आयडी बनवून नोंदणी करीत मालाची परस्पर विल्हेवाट लावून २७ लाख ६५ हजार ७६० रुपयांची (Fraud) फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्या दोन डिलिव्हरी बॉईजविरोधात शहर पोलिस (Police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Marathi News)

एन्टेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. चे कायदेविषयक कार्यकारी अधिकारी मयूर भीमराव शिंदे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटल्यानुसार, कंपनीतर्फे शिरपुरात डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर म्हणून (Shirpur News) प्रवीण भास्कर बाविस्कर (रा. गौरव हॉटेलमागे, करवंद रोड, शिरपूर) याची नियुक्ती केली होती. त्याच्यासोबत विवेक नामदेव कोळी (रा. खामखेडा, ता. शिरपूर) काम करीत होता. जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत दोघांनी फ्लिपकार्ट ब्रॅंडचा वापर करून ग्राहकांचा बनावट आयडी तयार केला. त्याद्वारे माल मागवून त्याची परस्पर विल्हेवाट लावली.

माल परत केल्‍याचे दर्शविले

अन्य ग्राहकांना माल डिलिव्हरी करुन त्यांच्याकडून पैसे घेतले. पण कंपनीला मात्र ग्राहकाने माल परत केल्याचे दर्शवले. तथापि मालाची रक्कम किंवा माल यापैकी काहीच परत केले नाही. कंपनीने हिशेब केल्यावर तब्बल २७ लाख ६५ हजार ७६९ रुपयांची तफावत समोर आली. त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर दोघांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत कबुली दिली. शहर पोलिसांनी संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT