Indore Accident : मंदिरच बनलं मौत का कुआ! इंदूर दुर्घटनेत मृतांचा आकडा ३५ वर, बचावकार्य सुरू

या मंदिरात अलेली विहिरीत तब्बल ५० फूट खोल आहे.
Indore Accident
Indore AccidentSaam TV
Published On

Accident : मध्य प्रदेशमधील इंदूर परिसरात रामनवमीच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली. बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना काही भाविक मंदिरात असलेल्या विहिरीवरील छतावर उभे होते. जास्त वजन पडल्याने विहिरीचे छत अचानक खाली कोसळले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ३५ वर पोहचली आहे. (Indore Temple)

घटनेची माहिती मिळताच कालपासून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बाचावकार्य सुरू आहे. या घटनेत आतापर्यंत ३५ जणांचे मृतदेह सापडलेत. तसेच १८ व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप अनेक व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Indore Accident
Sangli Crime News : इस्लामपुरात पोलिस ठाण्याच्या दारात दाेघींचा आत्मदहनाचा प्रयत्न

इंदूर दुर्घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना सरकारमार्फत प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंदिरातील दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. काल मृतांचा आकडा १३ वर होता आज सकाळी मृतांचा आकडा ३५ वर पोहचला आहे.

तब्बल ५० फूट खोल विहीर

रामनवमीला पटेलनगर भागातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंदिरात मोठ्यासंख्येने भाविक उपस्थित होते. या मंदिरात असलेली विहिरीत तब्बल ५० फूट खोल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर आणि त्यातील ही विहीर आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. याच विहिरीवर २० ते २५ जण उभे असल्याने ही दुर्घटना घडली. विहिरीचे छत कोसळल्यावर इतर व्यक्ती देखील विहिरीत पडल्या.

Indore Accident
Indore Jhulelal Mandir Accident: इंदूर मंदिर दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्यू, मध्य प्रदेश सरकारकडून मदतीची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com