Shirdi, Sai Baba, bhagyashree banayat
Shirdi, Sai Baba, bhagyashree banayat saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईंच्या झाेळीत ३९८ कोटींचे दान

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून गणले जाणारे शिर्डी येथील साईबाबा संस्थानला मागील एका वर्षात सुमारे ३९८ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे विक्रमी दान प्राप्त झाले आहे. कोविड निर्बंध उठल्यानंतर माेठ्या संख्येने भाविक साईंच्या चरणी शिर्डीत येत आहेत. भाविक भक्तीभावाने साईंच्या चरणी दान अर्पण करीत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या कोविड निर्बंध उठवण्यात आल्यानंतर गतवर्षी ७ ऑक्टोबरला साई मंदिर पुन्हा सुरू झाले. १२ महिन्यात कोट्यवधींच दान प्राप्त झाले असून यात २७ किलो सोन्याचा (gold) देखील समावेश आहे.

बानायत म्हणाल्या दिवसेंदिवस साई (sai baba) संस्थानला प्राप्त होणाऱ्या दानात वाढ होत असून भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. प्राप्त दानात रोख रकमेसह, मनी ऑर्डर, चेक, डीडी, सोने, चांदी, मोती यांचा समावेश आहे. या दानाचा उपयोग साईभक्तांच्या मुलभूत सुविधांसाठी करण्यात येतो. (Maharashtra News)

केजी ते पीजी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी साईबाबा संस्थानकडून सुमारे २१८ कोटीचे शिक्षण संकुल उभारले जात आहे. भाविकांच्या सुकर दर्शनसाठी (shirdi) नवीन दर्शन रांग सुरू होणार असून त्यासाठी सुमारे १०९ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. साई संस्थान मार्फत दोन मोठी रुग्णालये देखील चालवली जातात तर राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साई संस्थान वेळोवेळी मदत करत असते असेही भाग्यश्री बानायत (bhagyashree banayat) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज, नेमकी कशावरून जुंपली?

Dombivali News: लोकलगर्दीचा बळी! डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, Video

Today's Marathi News Live : मुंबई उत्तरसाठी तेजस्वी घोसाळकर यांचा काँग्रेसकडून लढण्यास नकार?

SCROLL FOR NEXT