BEST Bus, Railway,
BEST Bus, Railway, saam tv

Mumbai Local Mega Block : रविवारी रेल्वेचा मेगा ब्लाॅक; प्रवाशांसाठी बेस्ट सज्ज, शनिवारपासून जादा बसेस

रेल्वेच्या साठ टक्के फे-या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत.
Published on

कर्नाक पुल तोडण्यासाठी येत्या शनिवारी रात्रीपासून रविवार रात्रीपर्यत रेल्वे २७ तासांचा ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून रविवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यत १२ जादा बस सोडलेल्या आहेत.

सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानचा ब्रिटिशकालीन कर्नाक पूल येत्या शनिवारी (ता. १९ नोव्हेंबर) रात्रीपासून तोडण्याचे काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे २७ तासांच्या या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. या ब्लॉक कालावधीत लोकल फक्त मध्य रेल्वेवर भायखळा आणि हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यत धावणार आहेत. सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतुक पूर्ण बंद राहणार आहे. या मेघा ब्लाॅकमुळे रेल्वेने ३६ मेल-एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.

BEST Bus, Railway,
Ambernath : अंबरनाथ गोळीबार प्रकरणी दहा अटकेत; माजी नगरसेवकाचा शाेध सुरु

प्रवाशांच्या सेवेसाठी 'बेस्ट' चे नियाेजन

रेल्वेच्या (railway) ब्लाॅकमुळे बेस्टने (best) शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत जादा बस साेडण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी - वडाळा, सीएसएमटी - दादर आणि भायखळा (प) - कुलाबा (प्रत्येक मार्गावर चार अतिरिक्त बस)

रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत इलेक्ट्रिक हाऊस- वडाळा (प), सीएसएमटी- धारावी डेपो, मुखर्जी चौक- प्रतीक्षा नगर, मंत्रालय- माहुल, इलेक्ट्रिक हाउस- के सर्कल आणि अँटॉप हिल- कोतवाल उद्यान या मार्गावर ३५ जादा बस (bus) सोडण्यात येणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

BEST Bus, Railway,
Trains Cancelled : तपोवन एक्सप्रेससह मुंबईला जाणा-या १२ ट्रेन रद्द
BEST Bus, Railway,
Mumbai Goa Highway : परशुराम घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com