- सचिन बनसाेडे
सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा वैश्विक संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये देशभरासह परदेशी असे लाखाे भाविक शिर्डीत दाखल झाले हाेते. भाविकांनी साई बाबा यांचे दर्शन घेत तब्बल १६ कोटी रुपयांचे दान साईंच्या चरणी अर्पण केले. याबाबतची माहिती साईबाबा संस्थानचे (saibaba sansthan) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)
तुकाराम हुळवले म्हणाले 23 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत 8 लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले. या दहा दिवसांच्या कालावधीत जवळपास 16 कोटींचे दान प्राप्त झाले आहे. यामध्ये दानपेटीत 7 कोटी 80 लाख प्राप्त झाले आहेत.
याबराेबरच देणगी काऊंटरमध्ये 3 कोटी 53 लाख, ऑनलाईन देणगीतुन तब्बल 4 कोटी 21 लाख तसेच 32 लाख रूपयांचे सोने तर 7 लाख 67 हजार रूपये किमतीची चांदी भाविकांनी अर्पण केली आहे.
तुकाराम हुळवले म्हणाले विविध माध्यमातून एकुण 15 कोटी 96 लाख रूपयांचे भरभरून दान मिळाले आहे. सुमारे 6 लाख भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा लाभ घेतला आहे. तसेच 11 लाख लाडू पाकीटांची विक्री देखील झाली आहे. याबराेबरच 7 लाख 46 हजार भक्तांना मोफत बुंदी पाकीट वाटल्याचे हुळवलेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.