Shirdi Railway Station To Get ₹60 Crore Upgrade Ahead Of Kumbh Mela saam tv
महाराष्ट्र

Shirdi: कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; ६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Shirdi Railway Station Infrastructure: शिर्डी रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 60 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. दोन नवीन आयलँड फलाट आणि पाच नवीन स्टेबलिंग लाईन्स उभारल्या जाणार आहेत.

Bharat Jadhav

  • शिर्डी रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी ₹60 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

  • स्थानकावर दोन नवीन आयलँड फलाट आणि पाच स्टेबलिंग लाईन्स उभारल्या जाणार

  • साईबाबा भक्त आणि कुंभमेळ्यातील यात्रेकरूंना अधिक आधुनिक व सोयीस्कर रेल्वे सुविधा मिळणार

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांच्या सुख सोयीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. रस्त्यांची कामांना वेग घेतला आहे. नाशिकमधील द्वारका चौकाच्या सुधारणेसाठी २१४ कोटींच्या प्रकल्पाचे काम चालू आहे. दुसरीकडे पुणे रेल्वे प्रशासनाने शिर्डी येथील स्थानकाच्या विस्ताराचा निर्णय घेतला आहे. ६० कोटी रुपये खर्चून दोन नवीन फलाट आणि पाच स्टेबलिंग लाइन टाकल्या जाणार आहेत.(Shirdi railway station expansion project before Kumbh Mela)

शिर्डी स्थानकावर सध्या तीन फलाट असून, आता चार आणि पाच क्रमांकाचे दोन नवीन ‘आयलँड फलाट’ बांधले जातील. यासह गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी पाच नवीन स्टेबलिंग लाइन (रेल्वेचा रेक काही काळासाठी थांबून ठेवण्याची जागा) तयार केल्या जाणार आहेत. सध्या येथून दिवसाला चार गाड्या सुटतात, मात्र या विस्तारानंतर गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ करणे शक्य होईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.

शिर्डी स्थानकावरील पायाभूत सुविधांसाठी ६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस आहे. यामुळे स्थानकाची प्रवासी हाताळणी क्षमता वाढेल, याचा फायदा नवीन फलाटांमुळे एकाच वेळी अधिक गाड्या स्थानकावर येऊ शकतील. स्टेबलिंग लाइनमुळे गाड्यांची स्वच्छता आणि देखभाल सुलभ होण्यास मदत होईल. यासह रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक सुरळीत होईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रेले विभाग पुणे, हेमंत कुमार बेहरा यांनी दिली.

३०० कोटींमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलाट विस्तारीकरण आणि २ नव्या फलटाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. २४ डब्यांच्या गाड्यांसाठी ४ फलाट यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी ३०० कोटी खर्च अपेक्षित आहे. पुणे रेल्वे स्थानकावर एकूण ६ फलाट आहेत. विस्तारीकरण केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट संख्या ८ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT