Shirdi Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime News : शिर्डीतील वेश्या व्यवसायावर टाच, हाॅटेल्सनंतर पाेलिसांचा बंगल्यावर छापा

Siddharth Latkar

- संदीप बनसाेडे

Shirdi Crime News : शिर्डीत पुन्हा एकदा हाय प्रोफाइल देहविक्रेय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पाेलिसांना यश आले आहे. चक्क एका बंगल्यात हा गोरखधंदा सुरू होता. पाेलिसांनी या बंगल्यावर छापा टाकून एका पिडीत मुलीची सुटका केली. या घटनेतील दोन संशयित आरोपींची कसून चाैकशी करुन त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

डीवायएसपी संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असल्याचे देखील बाेलले गेले. त्यामुळे पाेलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकला.

यावेळी पाेलिसांनी एका पिडीत मुलीची सुटका केली. यामध्ये दाेघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दाैलत किसन लटके (वय 47) आणि अकुश संजय घोडके (वय 19) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी डीवायएसपी संदीप मिटके यांचे कौतुक केले.

ही कारवाई राकेश ओला (पोलीस अधीक्षक), स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके, गुलाबराव पाटील, इरफान शेख, कुऱ्हे, शिंदे, जाधव ,भांगरे, गांगुर्डे या पाेलिस अधिकारी आणि कर्मचा-यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT