Shirdi Saibaba Sansthan Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Saibaba Sansthan: साईबाबा संस्थानच्या मंदिर पॉलिसी वादात: शिर्डी ग्रामस्थ करणार आंदोलन

Shirdi News : साईबाबा संस्थानच्या मंदिर पॉलिसी वादात: शिर्डी ग्रामस्थ करणार आंदोलन

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देशभरात साई मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेण्याचा आणि त्यासाठी भरीव आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र (Shirdi) शिर्डी ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध केला असून साईबाबा संस्थान (Saibaba Sansthan) विरुद्ध शिर्डी ग्रामस्थ असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (LIve Marathi News)

शिर्डीच्या साई संस्थानमध्ये सध्या उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली तदर्थ समिती काम बघत आहे. या समितीत अहमदनगर जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा चार लोकांचा या समितीत समावेश आहे. समिती देशभरात मंदिर उभारणीची आणि त्यासाठी आर्थिक मदत देण्याची नवीन पॉलिसी बनवण्याच्या विचारात आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर (Sai Temple) उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रूग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांनाही पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत आहे.

ग्रामस्थांचा विरोध 
शिर्डीच्या साई संस्थानमध्ये सध्या उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली तदर्थ समिती काम बघत आहे. ही समिती देशभरात मंदिर उभारणीची आणि त्यासाठी आर्थिक मदत देण्याची नवीन पॉलिसी बनवण्याच्या विचारात आहे. त्यासाठी शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांकडून संस्थानने अभिप्राय मागवले आहेत. मात्र शिर्डी ग्रामस्थांनी संस्थानच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिर्डीत अनेक समस्या असताना आणि शिर्डीचा विकास रखडलेला असताना साई संस्थानचा पैसा बाहेर देऊ नये अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT