Shirdi News:  Saamtv
महाराष्ट्र

Shirdi News: अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम; २४ वर्षात केले २३०० मुलींचे कन्यादान

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. ३ मे २०२४

सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 41जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे 24 वे वर्ष असून आज तागायत कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने 2300 मुलींचे कन्यादान केले आहे. त्यामुळे स्वतःला मुलगी नसतानाही कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य लाभले आहे.

शिर्डीमधील रहिवासी असलेले कैलास कोते आणि सुमित्रा  कोते या दाम्पत्याला मुलगी नसल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा आदर्श निर्णय घेतला. गेल्या २४ वर्षांपासून कोते यांच्याकडून सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला केला. विशेष म्हणजे अवघा एक रुपया भरुन या विवाह सोहळ्यात नाव नोंदवता येते.

यामध्ये लग्न करणाऱ्या वधु-वरास कोते दांपत्याकडून नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना जेवणही दिले जाते. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष असून ४१ जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. अवघ्या एका रुपयात नवा संसार फुलवणाऱ्या कौते दांपत्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, स्वतःला लेक नसताना आजपर्यंत राज्यातील २३०० मुलींचे कन्यादान करण्याचे सौभाग्य कोते दांपत्याला लाभले. या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात.. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT