Shirdi News Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi News: मस्तच! स्वतःला मुलगी नसताना कोते दाम्पत्याने केले 2100 मुलींचे कन्यादान

Shirdi Kanyadan News: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरलाय एव्हढं मात्र नक्की.

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Shirdi News: सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ४० हिंदू आणि २१ बौद्ध अशी ६१ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे २३ वे वर्ष असून आज पर्यंत कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने २१०० मुलींचे कन्यादान केले आहे. विशेष म्हणजे यावर्षी विदर्भातील ४० जोडपी विवाह बंधनात अडकलीत.  (Latest Marathi News)

शिर्डीतील (Shirdi) कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याला मुलगी नसल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह (Marriage) सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा निश्चय केलाय. गेल्या २३ वर्षांपासून कोते यांच्याकडून शिर्डीत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो.

अवघा एक रुपया शुल्क भरून या विवाह सोहळ्यात नोंदणी करता येते.. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते. यावर्षी ६१ जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय.

कोते दाम्पत्याने गेल्या २३ वर्षांपासून सुरू केलेल्या या सामुदायीक विवाह सोहळ्यात शिर्डीचे आमदार तथा राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे स्वागोतोत्सुक म्हणून जबाबदारी पार पाडतात. कोते दाम्पत्याने सुरू केला हा उपक्रम सामाजिक चळवळ बनली असून सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे विखे पाटील म्हणालेत.

ज्यांचा विवाह याठिकाणी पार पडला त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू- वरही समाधानी होते. तर कोते दाम्पत्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आशीर्वादाने संसासारची सुरुवात होत असल्याने वधू-वरांना आनंद झाल्याचे दिसून आले.

स्वतःला मुलगी नसताना राज्यातील २१०० मुलींचे कन्यादान करण्याचे सौभाग्य कोते यांना लाभले आहे. या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरलाय एव्हढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT