Nagpur News
Nagpur NewsSaam Tv

Nagpur News: बर्थडे ठरला शेवटचा; रात्री सेलिब्रेशन अन् पहाटे तरुणाने...

Bhivapur News: रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने सर्वांसोबत बर्थडे सेलिब्रेशन केले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास...
Published on

Nagpur Latest News: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवापूर येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले आहे. रविवारी (दि. ३०) त्याचा वाढदिवस होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने सर्वांसोबत बर्थडे सेलिब्रेशन केले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

श्रेणिक लांबाडे (२३) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे शेखापूर ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील मूळ रहिवासी हाेता. तरुणाच्या या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच श्रेणीकच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

Nagpur News
Nashik CCTV Footage: टोळक्याचा सोसायटीमध्ये घुसून तरुणावर जीवघेणा हल्ला, थरारक घटनेचा VIDEO आला समोर

श्रेणिक लहानपणापासूनच भिवापूर येथील ऑफिसर कॉलनीत राहणारे मोठे वडील तुकाराम ठाकरे यांच्याकडे शिकला. मागील दीड वर्षापूर्वी तो आपल्या शेखापूर येथे आई-वडिलांकडे राहायला गेला होता. आता उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने महिनाभरापूर्वी श्रेणिक भिवापूर येथे माेठ्या वडिलांकडे आला हाेता. (Nagpur News)

घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ताे मित्रांसाेबत होता. घरी परतल्यानंतर श्रेणिकने कुटुंबीय आणि मित्रांसाेबत केक कापत वाढदिवस साजरा केला. त्यानंतर कुटुंबीय झोपी गेल्यानंतर श्रेणिकने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली.

Nagpur News
Nandurbar News : अतिदुर्गम भागातील दरीतून येत होता 'वाचवा वाचवा' आवाज; गावकऱ्यांनी जाऊन पाहिलं तर...

पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा प्रकार समजताच कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून पंचनामा केला. भिवापूर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपुर्द करण्यात आला. त्याच्यावर शेखापूर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, श्रेणिकनेने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com