Nandurbar News : अतिदुर्गम भागातील दरीतून येत होता 'वाचवा वाचवा' आवाज; गावकऱ्यांनी जाऊन पाहिलं तर...

धडगाव तालुक्यातील गेंदा माळ या ठिकाणी 80 फूट खोल दरीतून वाचवा वाचवा असा आवाज येत होता.
Nandurbar
NandurbarSaam Tv
Published On

सागर निकवाडे

Nandurbar News : नंदूरबार येथील सातपुडा पर्वतरांगांमध्ये एक व्यक्ती अडकल्याची घटना समोर आली आहे. खोल दरीत हा व्यक्ती अडकला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भाग असलेल्या गेंदा माळ परिसरात एक 40 वर्षीय अज्ञात व्यक्ती दरी अडकल्याची माहिती आहे. धडगाव तालुक्यातील गेंदा माळ या ठिकाणी 80 फूट खोल दरीतून वाचवा वाचवा असा आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं. (Latest Marathi News)

Nandurbar
IAS Officer Transfer : 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढेंकडे नवी मोठी जबाबदारी

कोणीतरी दरीत अडकलं असल्याचं गावकऱ्यांना दिसून आलं. गावकऱ्यांनी लगेचच धडगाव पोलीस आणि वन विभागाला याची माहिती दिली. धडगाव पोलिस आणि वन विभागाच्या टीमने या व्यक्तीला दोरीच्या साहायाने वर ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला आहे.

Nandurbar
EXPLAINER: शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

रेस्क्यू करण्यात पोलिसांना अपयश आल्याने आता धुळे येथील एनडीआरएफच्या टीमला रेस्क्यू करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. आज सकाळी एनडीआरएफ टीमच्या सहायाने दरीत अडकलेला व्यक्तीला रेस्क्यू करण्यात येणार आहे. मात्र दरीत अडकलेला व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com