Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : साईबाबा चरणी कोट्यवधींचे दान; नववर्षानिमित्त ६ लाख भाविक शिर्डीत

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशात आहेत. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून या भाविकांकडून दान देखील करण्यात येत असते. काही भाविक सोने- चांदीचे दागिने अर्पण करतात

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशातून दर्शनासाठी येत असतात. यात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लाखो भाविक दाखल झाले होते. या भाविकांकडून साई चरणी भरभरून दान टाकण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारे भाविकांकडून मागील नऊ दिवसात तब्बल १६ कोटी ६१ हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे. 

शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशात आहेत. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून या भाविकांकडून दान देखील करण्यात येत असते. काही भाविक सोने- चांदीचे दागिने अर्पण करतात. तर काही भाविक रोख रक्क्मेस्वरूपात दान देत असतात. दरम्यान नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून साईबाबांना भरभरून दान देण्यात आले आहे. अजून देखील भाविकांची गर्दी असून दान देणे सुरूच आहे. 

१६ कोटी ६१ लाखांचे दान 

साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून मागील ९ दिवसात तब्बल १६ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे. हे दान २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत कोट्यवधींचे दान झाले आहे. याशिवाय आजून देखील भाविकांची गर्दी कायम असून दूरवरून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. यामुळे साईचरणी येणाऱ्या देणगीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अशी आली दान स्वरूपात रक्कम 

२५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान साधारण ६ लाखांहून अधिक भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. साईबाबांना देण्यात आलेल्या देणगीत दानपेटीत ६ कोटी १२ लाख मिळाले. तर देणगी काऊंटरवर ३ कोटी २२ लाख जमा झाले आहेत. ऑनलाईन देणगी चेक, डीडी, मनी ऑर्डर, डेबिट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ कोटी ६५ लाख मिळाले. तर ५४ लाख ५० हजार रुपयांचे सोने. ९ लाख ९३ हजार रुपयांची चांदी. सशुल्क देणगी पासच्या माध्यमातून १ कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

SCROLL FOR NEXT