Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Yavatmal News : सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठरा हजार पाचशे रूपये मिळण्याऐवजी केवळ सहा हजार नऊशे एवढी तुटपुंजी रक्कम झाली. यामुळे शेतकरी हताश झाला असून रक्कम परत करत आहे
Yavatmal Farmer
Yavatmal FarmerSaam tv
Published On

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ : राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील नुकसानीपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. मात्र हि मदत कमी असून तुटपुंजी मदत नकोय, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही; असे म्हणत शेतकऱ्याने ६ हजार ९०० रूपयांचा धनादेश तहसीलदार मार्फत सरकारला परत केला आहे. 

यंदाच्या खरिपात राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे राज्य सरकारने ऐकतीस हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील अल्पभूधारक शेतकरी रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांच्या खात्यात १८ हजार ५०० रूपये जमा होण्याऐवजी ६ हजार ९०० रूपये जमा झाले आहेत.

Yavatmal Farmer
Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

धनादेश स्वरूपात रक्कम केली परत 

त्यामुळे मला तुटपुंजी सरकारची मदत नकोय म्हणून जमा झालेली रक्कम तहसीलदार मार्फत सरकारला धनादेशद्वारे परत केली. शेतकरी रमाकांत कोल्हे यांनी धनादेश सोबत सरकारला एक निवेदन देखील दिले. त्यात शेतकऱ्याने लिहिलं की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जेव्हा जाहिर केली. तेव्हा आम्हाला हिम्मत आली. कोणीतरी आमच्या मागे आहे, असं वाटलं. मात्र जमा झालेल्या रक्कमेचा मोबाईलवर मेसेज आला आणि मेसेज बघुन अंतःकरणातून दुःखी झालो. 

Yavatmal Farmer
Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

शब्द पाळता येत नसेल, तर शब्द देऊ नका

सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठरा हजार पाचशे रूपये मिळण्याऐवजी केवळ सहा हजार नऊशे एवढी तुटपुंजी रक्कम झाली. यामुळे मुख्यमंत्री देणगी जमा करत आहे. मला दिलेली नुकसान भरपाईची तुटपुंजी रक्कम सरकारला आणि सरकारमधील मंत्र्यांना चांगल्या कामासाठी कामी येईल. म्हणुन मी रक्कम परत करतोय. दिलेला शब्द पाळता येत नसेल, तर शब्द देऊ नका. एक दिवाळी साजरी केली नाही तर मी मरणार नाही; असाही आमच्या वाट्याला कायम संघर्ष आलाय. अशा स्वरूपाचं निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.

मदतीची घोषणा, अद्याप परिपत्रक नाही 

मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा करून तीन दिवस झाले आहे. मात्र अजूनपर्यंत नव्याने परिपत्रक GR आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसमज झाल्याने त्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली सहा हजार ९०० रुपयाची मदत सरकारला धनादेश द्वारे परत केली. शेतकऱ्यांनी थोडे दिवस वाट बघावे असं स्थानिक प्रशासनाने सांगितल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com