सचिन बनसोडे
शिर्डी (अहिल्यानगर) : तिरुपती बालाजी दर्शन रांगेतील घटनेनंतर देशभरातील मोठ्या धार्मिक स्थळांच्या दर्शन रांगेतील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. बालाजी देवस्थाननंतर सर्वाधिक श्रीमंत आणि भाविकांची गर्दी होणारे देवस्थान म्हणजे शिर्डीचे साई मंदिर आहे. दररोज सरासरी ६० हजार तर वर्षाकाठी सरासरी ३ कोटी भाविक साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येतात. येथे येणाऱ्या भाविकांना दोन दर्शन रांगेतून साई दर्शन दिले जाते.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. देश- विदेशातून साईबाबांचे भक्त दाखल होत असतात. दरम्यान येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या प्रकारे दर्शन कसे घेता येईल? यानुसार साई मंदिर संस्थानने काळजी घेतली आहे. प्रामुख्याने साई मंदिरात सशुल्क आणि निःशुल्क अशी दर्शन व्यवस्था आहे. या दोन्ही दर्शन व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने नेमकी कशी आहे? याबद्दल माहिती पाहुयात.
१२ प्रशस्त हॉल
एक वर्षापूर्वी अद्ययावत, सुसज्ज आणि वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्सची निर्मिती साई मंदिरात करण्यात आली आहे. तसेच या इमारतीमध्ये भाविकांसाठी एकूण १२ प्रशस्त हॉल असून प्रत्येक हॉलमध्ये ८०० भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर एकाचवेळी अगदी आरामात दहा हजार भाविक या बारा हॉलमध्ये बसू शकतील; अशी व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. तर महिलांना लहान मुलांच्या स्तनपानासाठी ६ खोल्या आहेत. दर्शन कम्लेक्समध्ये दोन मजले असून १० लिफ्टची सुविधा आहेत. तसेच भाविकांना प्रवेश पास बायोमेट्रिक मशिनचे ४८ काउंटर असून याठिकाणाहून भाविकांना लागलीच पास घेता येणे शक्य आहे.
भाविकांसाठी अशा आहेत सुविधा
अद्ययावत दर्शन रांगेत साईभक्तांना मोफत चहा, कॉफी, बिस्कीट, पाणी आदी सुविधा उपलब्ध असून भाविकांचे चप्पल, बूट, मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर व्यवस्था देखील आहे. भाविकांच्या पर्स तसेच इतर वस्तूंची तपासणीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने ६६ अत्याधुनिक स्कॅनर मशीन, २५ बॉडी स्कैनर मशीन, मेटल दरवाजे आहेत. सशुल्क दर्शन आणि आरती पाससाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने भाविकांसाठी हि सुविधा सोयीची ठरत आहे. सशुल्क दर्शन पास आणि आरती पासच्या सुविधेसाठी दर्शन कॉम्प्लेक्समध्ये एकूण 20 काउंटरची उभारणी करण्यात आली. सकाळी ७ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत कॉम्प्लेक्समध्ये दर्शन आणि आरती पास काढण्याची सुविधा. भाविकांसाठी बुंदी, लाडू, उदी, देणगी काउंटर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.