Shirdi politics  Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Politics : ४ वर्षांपासून प्रचार, ऐनवेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण SCसाठी जाहीर; साईबाबांच्या शिर्डीत दिग्गजांचा हिरमोड

Shirdi Politics News : शिर्डी नगराध्यक्षपदाचं आरक्षण अनुसूचित महिलांसाठी जाहीर झालं आहे. यामुळे साईबाबांच्या शिर्डीत दिग्गजांचा हिरमोड झाला आहे.

Vishal Gangurde

शिर्डी नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातींच्या महिलेसाठी राखीव

खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुकांचा हिरमोड

शिर्डी शहरात कही खुशी कही गम असे चित्र

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातींच्या महिलेसाठी आरक्षित झालं आहे. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुकांचा हिरमोड झालाय. इच्छुकांनी गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले कॅम्पेनिंग केले होते. मात्र आरक्षण जाहीर होताच शिर्डीतील दिग्गजांना मोठा धक्का बसलाय. काहींनी जाहीररित्या तर काहींनी बॅनरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्याने शिर्डीत कही खुशी कही गम असे चित्र आहे.

कोटी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली साईबाबांची शिर्डी.. राज्यातील दिग्गज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ असलेली शिर्डी.. याच शिर्डीच्या राजकारणात दबदबा ठेवण्यासाठी अनेक स्थानिक नेते ताकद लावत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने शिर्डीच्या नगराध्यक्ष पदाची स्वप्ने बाळगून अनेक दिग्गजांनी गेल्या ४ वर्षांपासून विविध माध्यमातून आपली दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिर्डी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी जाहीर होताच शिर्डीतील स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. काहींनी विखे पाटील सांगतील, त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवू असे म्हटले आहे, तर काहींनी बॅनरबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले ही साईबाबांची इच्छा असून शिर्डीत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलाय. शिर्डीत खुल्या प्रवर्गातील दिग्गजांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असले, तरी राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. आपल्या गोटातील अनुसूचित जातीच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी बसवण्यासाठी आगामी काळात पडद्यामागे राजकीय डावपेच बघायला मिळणार आहे. त्यामुळे शिर्डी नगराध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

१६ नगरपरिषदांवर SC महिलांसाठी आरक्षण

राज्यात २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झालंय. यामध्ये ३३ नगरपरिषदांपैकी १६ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झालंय. मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज आणि बीड नगरपरिषदेत अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

SCROLL FOR NEXT