Shirdi Crime Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Crime: शिर्डीत रक्तरंजित थरार! महिलांकडून दुसऱ्या महिलेवर चाकूने सपासप वार, साई मंदिर परिसर हादरला

Shirdi Saibaba Temple: शिर्डीच्या साईबाब मंदिरासमोर रक्तरंजित थराराची घटना घडली. एका महिलेवर चार ते पाच फेरिवाल्या महिलांनी हल्ला केला. चाकूने सपासप वार करण्यात आले.

Priya More
  • शिर्डीतील साई मंदिराजवळ भयंकर घटना

  • फेरिवाल्या महिलेवर चाकू हल्ला

  • चार ते पाच महिलांनी या महिलेवर जीवघेणा हल्ला केला

  • शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

शिर्डीमध्ये महिलेवर चाकूने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. साई मंदिर परिसरात हा रक्तरंजित थरार घडला. या घटनेमुळे मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. चार ते पाच महिलांनी एका महिलेवर चाकूने सपासप वार केले. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीच्या साई मंदिर परिसरात स्टिकर विकणाऱ्या चार ते पाच महिलांनी काकडी विक्रेत्या महिलेवर जीवघेणा हल्ला केला. रविवारी रात्री ही घटना घडली.साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर भर गर्दीत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

या चाकू हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर(३० वर्षे) ही काकडी आणि कैर विकणारी महिला गंभीर जखमी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्दळीच्या ठिकाणी महिलांनीच दुसऱ्या महिलेवर धारधार चाकूने वार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुंड प्रवृत्तीच्या काही महिला हातविक्रेत्यांमुळे साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे साई मंदिर परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

Maharashtra Government: फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Maharashtra News Live Update: पवई आयआयटीसमोर पुन्हा आंदोलन! साहिल वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी

Plane Hijack Alert : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, जयपूर विमानतळावर विमान हायजॅकचा अलर्ट; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT