Radhakrishna Vikhe Patil Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News : पालकमंत्री विखे पाटलांनी उचलला जखमी वारकऱ्यांच्या उपचारांचा खर्च; मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही प्रस्ताव

Ahmednagar News : शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून चार वारकऱ्यांचा मृत्यू तर दहा वारकरी जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावर ३ डिसेंबरला घडली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून चार वारकऱ्यांचा मृत्यू तर दहा वारकरी जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावर ३ डिसेंबरला घडली होती. (Accident) अपघातामध्ये सर्व जखमी वारकऱ्यांच्या उपचारांचा खर्च महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उचलला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या असून जखमींच्‍या उपचारांची सर्व माहीती मंत्र्यांनी डॉक्‍टरांकडून जाणून घेतली. (Live Marathi News)

साईबाबा पालखी शिर्डी येथे मार्गस्थ झाली होती. परंतु संगमनेर तालुक्यातील माउली घाटानजीक दिंडीत कंटेनर घुसून अपघात झाला होता. राहाता तालुक्यातील कनकुरी येथील भाऊसाहेब नाथा जपे, को-हाळे येथील ताराबाई गमे, शिर्डी येथील बबन थोरे आणि कोपरगावचे बाबासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य जखमी वारकऱ्यांना संगमनेर येथील कुटे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी सर्व जखमी व्यक्तींवर तातडीने आवश्यक उपचार (Ahmednagar) करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रात्री उशिरापर्यत जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह स्थानिक अधिकारी रुग्णालयात थांबून होते. मंत्री विखे पाटील यांनीही उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी रुग्णांचे सर्व वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर काही रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू असून आजही मंत्री विखे पाटील यांनी जखमीच्या उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली. या सर्व रुग्णांवर कोणताही अर्थिक भार येवू देवू नका. उपचारांचा सर्व खर्च मंत्री विखे पाटील यांनी करण्याची जबाबदारी घेवून जखमी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही जखमींना मदत होण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत प्रशासनास सुचना दिल्या.  दरम्यान पुणे महमार्गावरून आळंदीकडे जणाऱ्या सर्व दिंड्यांची संख्या लक्षात घेवून या मार्गावर वातुकीचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

SCROLL FOR NEXT