शिर्डीत सर्व व्यवसायिकांची कोरोना चाचणी होणार Saam Tv
महाराष्ट्र

हजारो भक्त साईंच्या दर्शनाला, शिर्डीत सर्व व्यवसायिकांची कोरोना चाचणी होणार

शिर्डीकरांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : शिर्डीकरांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुट्टीच्या काळामध्ये हजारो साई भक्त साई बाबांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत दर्शनासाठी दाखल झाले होते. 28 डिसेंबर ते आजपर्यंत हजारो भक्त शिर्डीत येत आहे. त्यापार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Shirdi Administration Take All Traders And Shopkeepers Corona Test)

साई भक्तांसह इतर नागरिकांची शिर्डीत (Shirdi) मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हॉटेलचालकांचा, दुकानदारांचा शेकडो जणांशी संपर्क येतो. त्यामुळे व्यवसायिकांची सरसकट कोरोना (Corona) चाचणी करण्याचा निर्णय शिर्डी नगरपंचायतकडून घेण्यात आला आहे. शिर्डी नगरपंचायत मार्फत कोरोना चाचणी करण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -

शिर्डी शहरातील हॉटेल, इतर छोटे-मोठे व्यवसायिकांचा आलेल्या भाविकांशी संपर्क येत असल्यामुळे सर्व व्यवसायिकांची कोरोना चाचणी करण्याचे काम सुरु झाले आहे. किती कोरोना रुग्ण आढळून येतात हे आता चाचणी झाल्यानंतरच समोर येणार आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. आतापर्यंत, देशातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 1,892 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक 568 आणि 382 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनच्या 1,892 रुग्णांपैकी 766 बरे झाले आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT