मुंबई : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,379 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,007 जण कोरोनातून बरे झाले आहेत. यादरम्यान, 124 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, जो सोमवारच्या तुलनेत अधिक आहे. सोमवारी 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. (India reports 37,379 New COVID cases in last 24 hours)
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण
कोरोनाच्या डेल्टा (Delta) व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. आतापर्यंत, देशातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 1,892 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक 568 आणि 382 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनच्या 1,892 रुग्णांपैकी 766 बरे झाले आहेत.
हेही वाचा -
ओमिक्रॉनचे 1,892 रुग्ण
ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 1,892 वर पोहोचली आहेत. यामध्ये 6 राज्ये अशी आहेत जिथे 100 हून अधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 568 रुग्ण आहेत. त्यानंतर दिल्लीत 382, केरळमध्ये 185, राजस्थानमध्ये 174, गुजरातमध्ये 152 आणि तामिळनाडूमध्ये 121 रुग्ण आहेत.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.