basra star  saam tv
महाराष्ट्र

Basra Star : म्हणून तब्बल ३५ कोटीचं जहाज चाललंय भंगारात, मिळणार फक्त २ कोटी रुपये; नेमक कारण काय?

Ship Basra Star : निसर्ग चक्रीवादळात हे जहाज अडकून मिऱ्या किनाऱ्यावर ३ जून २०१९ ला आले होते. तांत्रिक बिघाडामुळे हे जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते. मात्र लाटांच्या माऱ्यामुळे हे नांगर तुटून हे जहाज मिऱ्या समुद्री किनारी येऊन लागले.

Saam Tv

अमोल कलये,साम टीव्ही

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळच्या विळख्यात अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षानंतर हे जहाज काढण्यात येणार असून, सुमारे ३५ कोटींचे हे जहाज भंगारमध्ये विकले जाणार असून याचा मोबदला फक्त दोन कोटी रुपये मिळणार आहे. ४० लाख सेवा शुल्क भरून केंद्र शासनाच्या परवनग्या घेण्याची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसात पार पडणार आहे.

एम.एम.शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे याबाबत कस्टम, मेरिटाई बोर्डाशी पत्रव्यवहार करत आहे. परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्यात या गंजलेल्या जहाजाला कापून बाहेर काढले जाईल.

निसर्ग चक्रीवादळात वाहून आलेल्या या जहाजाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

या जहाजामध्ये इंधनाची ने आण केली जायची. पाच वर्षापूर्वी हे जहाज दक्षिण आफ्रिकेहून दुबईहून जात होते. त्या रात्री निसर्ग चक्रीवादळाने कहर केला होता आणि बसरा स्टार जहाज हे 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळच्या विळख्यात अडकले. त्यावेळेस या जहाजामध्ये 13 क्रुजर होते. अत्यंत भयानवह अशी अवस्था त्या जहाजामध्ये त्या दिवशी झाली होती. मेरीटाईम बोर्ड, पोलिस, तटरक्षक दल, आदींच्या मदतीने रेस्क्यू करून १३ जणांचा जीव वाचविण्यात यंत्रणेला यश आले.

इंधन वाहून नेणारे हे जहाज! एवढ्या दूरवरचा प्रवास करुन आलेले हे जहाज ऐन कोविडच्या काळात आपल्या भारतीय समुद्रकिनाऱ्याला लागले. पण तेही जखमी परिस्थितीमध्ये. पावसामुळे आणि समुद्राच्या लाटांमुळे हे जहाज खराब झाले व वाहून आले रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या बंदरजवळ! यामध्ये तब्बल १३ लोकं होती. सध्या या जहाजाला गंज चढलाय! अवशेषच बाकी आहे. सध्या हे जहाज कोकण फिरणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरते आहे.ऐन कोविडच्या काळात आपल्या भारतीय समुद्रकिनाऱ्याला लागले. पण तेही जखमी परिस्थितीमध्ये. पावसामुळे आणि समुद्राच्या लाटांमुळे हे जहाज खराब झाले या जहाजाला संपूर्ण गंज चढला आहे. सध्या हे जहाज पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT