Eknath Shinde in damage control mode after his party ministers spark fresh controversies; Delhi visit raises political curiosity. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

From Corruption to Chaos: भ्रष्ट आणि वाचाळ नेत्यांमुळे एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकलेत. गेल्या तीन दिवसात शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे शिंदेसेनेच्या अडचणीत वाढ होतेय.. ती कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Omkar Sonawane

शिंदेसेनेच्या नेत्यांमागची वादाची मालिका काही संपता संपत नाही.. आणि ते निस्तरता निस्तरता शिंदेचं चक्रव्युहात अडकत चाललेत.. शिलेदारांमुळे अडचणी वाढत असतानाच शिंदेंनी अचानक दिल्ली दौरा केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. शिंदेंच्या शिलेदारांची वादग्रस्त काम आणि अचानक शिंदेंची दिल्लावारी यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता आहे. पक्षातील शिलेदारांनी शिंदेना अडचणीत कसं टाकलंय पाहूया..

शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?

1) अर्जुन खोतकर

खोतकरांच्या पीएच्या विश्रामगृहातील खोलीवर कोट्यवधी रुपये सापडले

याप्रकरणी खोतकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

2) संदिपान भुमरे

भावजयीला दारू परवाना मिळवून दिल्याचा आरोप

मंत्रिपदाचा गैरवापर केल्यानं छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल

3) संजय गायकवाड

आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

4) संजय शिरसाट

व्हिट्स हॉटेल प्रकरणी शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस

शिरसाट यांच्या खोलीत पैशांची बॅग असलेला व्हिडीओ व्हायरल

इथून पुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य

5) शंभूराज देसाईं

सभागृहात अपशब्द वापरत आमदार परबांना धमकी

गेल्या तीन दिवसांत शिंदेंच्या तीन मंत्र्यांच्या कारनाम्यांनी महायुतीत आपल्याच नेत्याची कोंडी केलीय. त्यामुळे महायुतीत धुसफुस सुरु आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.

दरम्यान स्वत:बरोबरच महायुतीलाही अडचणीत आणणाऱ्या नेत्यांना शिदेंनी कडक शब्दात समज दिल्याची चर्चा आहे.

शिंदेंनी नेत्यांचे टोचले कान

मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळतेय

बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची सक्त ताकीद

प्रतिक्रिया देताना चुकीची आणि पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका मांडू नये

शिंदेंसेनेच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे आणि कामामुळे महायुतीत पक्षाची कोंडी होतेय, हे निश्चित. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिंदेंच्या नेत्यांची बेशिस्त वागणुक पक्षाला आणि महायुतीला डोकेदुखी ठरू नये म्हणून शिंदेनी आत्तापासूनच या वादग्रस्त नेत्यांना आवरणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ, महिलेने विषप्राशन करून संपवली आपली जीवन यात्रा

Maharashtra Live News Update : वसईत क्लोरिनच्या सिलिंडरची गळती, एकाचा मृत्यू

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

SCROLL FOR NEXT