Shinde Sena MLAs Santosh Bangar and Sanjay Gaikwad face criticism and warnings over election-day misconduct Saam Tv
महाराष्ट्र

लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड राखावी, बांगर आणि गायकवाडांना शिंदेंची तंबी

Maharashtra Election Controversy: शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रातल्या कृत्याचा सर्वस्तरातून निषेध होतोय. तर बुलडाण्यातल्या बोगस मतदानावरुन झालेल्या राड्यामुळे आमदार संजय गायकवाडही वादात सापडलेत. एकनाथ शिंदेंनी आपल्या दोन्ही आमदारांना तंबी दिली आहे

Omkar Sonawane

महायुतीत टोकाचा वाद झाल्याने हिंगोलीतील निवडणूक चर्चेत होती. त्यातही मतदानाच्या दिवशी तर शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कहर केला. मतदान कक्षात त्यांनी एका महिलेलाही सुचना केली. एवढंच नाही स्वत: मत देताना मोबाईलमध्ये त्याचं चित्रिकरणही केलं. या गंभीर प्रकाराची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. तर दुसरीकडे बुलडाण्यात शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांचा मुलगा कुणाल गायकवाडने बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी मदत केलीय.

या दोन्ही घटनांवरुन सर्व स्तरावर संताप व्यक्त होतोय. यावर विरोधकही आक्रमक झाले असून बांगरांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी ठाकरेसेनेने केली आहे. तर ज्यांनी निवडणुकीत दंगल करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना अटक करा, अशी मागणी खासदार सुप्रीया सुळे यांनी केली. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड राखावी, अशा शब्दात शिंदे सेनेच्या आमदारांना फटकारलं आहे.

संपूर्ण निवडणुकीत बांगर यांनी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळेंवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हिंगोलीत दोन्ही मित्र पक्ष आमनेसामने आले.तर बुलढाण्यातील मंगळवारच्या राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाचीच पाठराखण केली शिंदे सेनेच्या या दोन्ही आमदारांची ही पहिलीच वेळ नाही. सतत वादग्रस्त वक्तव्य करुन बांगर आणि गायकवाडांनी यापूर्वीही पक्षश्रेष्ठींना जेरीस आणलंय.

आता तर त्यांची कृती लोकशाहीची थट्टा करणारी आहे. शिंदेंनी तंबी दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी फटकारल्यानंतर तरी दोन्ही आमदारांच्या वागण्यात सुधारणा होणार का? हे पाहणं महत्वाचं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Maharashtra Live News Update: पुण्यात मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं विरोधकांची कोंडी, शिंदेसेनेविरोधात चव्हाणांची रणनीती काय?

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय कृषीमंत्री-मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? राज्याने केंद्राला अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला की नाही?

SCROLL FOR NEXT