Eknath Shinde announces future political backing for rebel MPs, raising questions over Mahayuti’s 2029 seat-sharing strategy. saam tv
महाराष्ट्र

सर्व बंडखोर खासदारांना उमेदवारीची हमी, शिंदेंकडून 2029च्या उमेदवारांची घोषणा

Shinde Guarantees Tickets To Rebel MPs 2029 Impact: एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी करत ठाकरेसेनेचे 6 खासदार आपल्या गळाला लावले. मात्र उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या घोषणेमुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीतलं महायुतीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेरून आलेल्या या खासदारांचा प्रचार करावा लागू शकतो. तर दुसरीकडे, शिंदेंनी महायुतीतील आपल्या मित्रपक्षांचाही तोंडचा घास पळवलाय का? पाहा यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

ठाकरेसेनेतील बंडखोर खासदारांनी हातातली मशाल सोडली आणि एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला. मात्र, हे खासदार शिंदेसेनेत गेल्यानं पुढील काळात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय 6 बंडखोर खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली घोषणा. एकनाथ शिंदेंनी नेमकी काय घोषणा केली ते ऐका...

त्यांनी थेट या सर्व खासदारांनी २०२९ ची उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांच्याच पक्षात २०२४ मध्ये या खासदारांच्या मतदार संघातून पराभूत झालेल्या उमेदवारांची अडचण होणार आहे. एवढंच नव्हे तर भाजप आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारांचीही डोकेदुखी वाढणार आहे. नेमक्या कोणत्या मतदारसंघात हा पेच निर्माण होणार आहे ते पाहूयात...

2029 ला बंडखोरांना उमेदवारी

पराभूतांचं काय होणार?

ईशान्य मुंबई

संजय दिना पाटील ( मतं 4,50,937)

विजयी, ठाकरेसेना

V/S

मिहीर कोटेचा ( मतं 4,21,076)

पराभूत, भाजप

2029 ला बंडखोरांना उमेदवारी

पराभूतांचं काय होणार?

यवतमाळ

संजय देशमुख ( मते 5,94,807)

विजयी, ठाकरेसेना

V/S

राजश्री पाटील ( मते 5,00,334)

पराभूत, शिंदेसेना यवतमाळ

2029 ला बंडखोरांना उमेदवारी

पराभूतांचं काय होणार?

धाराशिव

ओमराजे निंबाळकर

विजयी, ठाकरेसेना (मतं 7,48,752)

V/S

अर्चना पाटील

पराभूत, राष्ट्रवादी(AP) ( मतं 4,18,906)

2029 ला बंडखोरांना उमेदवारी

पराभूतांचं काय होणार?

शिर्डी

भाउसाहेब वाकचौरे ( मतं 4,76,900)

विजयी, ठाकरेसेना

V/S

सदाशिव लोखंडे ( मतं 4,26,371)

पराभूत, शिंदेसेना

2029 ला बंडखोरांना उमेदवारी

पराभूतांचं काय होणार?

हिंगोली

नागेश आष्टीकर पाटील (मतं 4,92,535)

विजयी, ठाकरेसेना

V/S

बाबुराव कोहळीकर ( मतं 3,83,933)

पराभूत, शिंदेसेना

2029 ला बंडखोरांना उमेदवारी

पराभूतांचं काय होणार?

परभणी

संजय जाधव

विजयी, ठाकरेसेना ( मतं 6,01,343)

V/S

महादेव जानकर ( मतं 4,67,282)

पराभूत, रासप

आता एकनाथ शिंदेंच्या याच घोषणेची ठाकरेसेनेनं खिल्ली उडवलीय तर भाजपच्या ज्या पराभूत उमेदवाराची अडचण होणार आहे त्यांनी केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीसांचा हवाला देत आशावाद कायम ठेवलाय. तर भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंची घोषणाच फायनल असल्याचे संकेत दिले आहेत. पाहिलंत.. राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरेसेनेच्या ज्या खासदारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं होतं, तेच आता सत्तेत सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे, राज्यात शिंदेसेनेच्या खासदारांचं संख्याबळ वाढल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी आपल्या हक्काच्या जागा शिंदेसेनेला सोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आगामी 2029 लोकसभा निवडणुकीत या सहा जागांवरून महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह आहेत. शिंदेसेनेसाठी विरोधक घरात आणि स्वताचे कार्यकर्ते दारात अशी स्थिती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Department: राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

फुटीर खासदारांची भोंदूगिरी, बंडखोर खासदारांचा बुरखा टराटरा फाटला; बंडखोर 6 खासदार निधी खर्चात नापास

Maharashtra News Live Update: वाशीमच्या रिसोड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

Sangli : सांगलीतील 'या' हिल स्टेशनसमोर लोणावळा-खंडाळाही फिके पडेल, पावसाळी ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

मोठी बातमी! चार महिन्यातच तुकाराम मुंढेंना पालक सचिवपदावरून हटवलं

SCROLL FOR NEXT