नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे थेट विधानसभेपर्यंत पोहोचल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या ड्रग्सच्या काळ्या धंद्यांविरोधात ठाकरे गटाने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चावर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सडकून टीका केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत? किंवा सकाळी उठून तेच ड्रग्स घेतात की अशी शंका आता महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. रोज सकाळी उठून बेछूट आरोप करायचे. संजय राऊत यांचे सगळे आरोप नाशिकमधील ड्रग्सचा कारखाना उघडकीस आल्यानंतरचे आहेत.
ललित पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा किती ड्रग्स तस्करांवर कारवाई झाली, असा सवालही देवयानी फरांदे यांनी केला आहे. (Latest Marathi Update)
ललित पाटीलकडून मातोश्रीवर किंवा संजय राऊतांन हप्ते जात होते का? याची चौकशी गृहखात्याने करावी. ललित पाटील पकडला गेल्याने संजय राऊत यांचे नुकसान झालं म्हणून त्यांची तडफड झाली आहे. संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही देवयानी फरांदे यांनी केली आहे.
ड्रग्स तस्कर ललित पाटील यांचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ड्रग्सविरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचं कार्यालय असलेल्या शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग असणार आहे. आदित्य ठाकरे देखील या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती आहे. दरम्यान या ड्रग्सविरोधी मोर्चात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.