Abdul Sattar controversy
Abdul Sattar controversy  saam Tv
महाराष्ट्र

Abdul Sattar : अब्दुल सत्तार, वर्तन बेजबाबदार! कधी कार्यकर्त्याला किक, तर कधी हिंदू देवांना शिवीगाळ; वादाची ६ प्रकरणं

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Abdul Sattar Six controversy :

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तारांनी त्यांचा वाढदिवस मोठा धुमधडक्यात साजरा केला. सत्तारांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्यांना आणि सरकारला अडचणीत आणणार असं दिसतंय. कारण सत्तार अनेकदा वादात सापडलेत. कधी शिवीगाळ तर कधी थेट मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. कधी अधिकारी कार्यकर्त्यांना उघडपणे दमदाटी करतात तर कधी वादग्रस्त विधान करून सत्तार चर्चेत राहिलेत. (Latest News)

आता तर त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमचं वादाचे कारण ठरत आहे. सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या गौतमी पाटील लावणी कार्यक्रमात गोंधळ उडाला. त्यावरून जमलेल्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करा आणि आत घाला असे आदेश देत अश्लील भाषेत दम दिला. त्यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Shiv Sena) आणि आता एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे मंत्री (Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमीच वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिकांमुळे चर्चेत राहतात. मग कधी हनुमानाच्या नावाने शिवीगाळ असो किंवा आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला केलेली मारहाण. तर कधी महिला नेत्यांवर खालच्या भाषेत केलेली टीका. इतकेच नाहीतर हे मंत्री महोद्यांवर अनेक घोटाळ्याचे आरोप झालेत. यापूर्वी वेगवेगळ्या घटनांमध्ये सत्तार अडचणीत सापडलेत परंतु ते राजकीय पटलावर मागे न येता पुढेच गेले. त्याच्या या वादग्रस्त राजकीय (Political) प्रवासाचा आपण आलेख पाहू..

1. काँग्रेसमध्ये असतांना २०१० मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. याचवेळी सत्तार राज्यमंत्री होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात सत्तार आणि एका काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे सत्तार यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर अब्दुल सत्तार यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

2. आघाडी सरकारमध्ये आमदार असताना एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याला मारहाण करीत शिवीगाळ केली होती. सोबतच हिंदूचं दैवत असलेल्या हनुमानाचं नाव घेत सत्तार यांनी ही शिवीगाळ केली होती.

3. मागच्या वर्षी एका महोत्सवाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून मंत्री सत्तारांचा राज्यभर निषेध करण्यात आला होता.

4. टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या नावाची चर्चेत आले होते. या घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नावं आले होते. त्यामुळे सत्तार यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती.

5. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री असतांना अब्दुल सत्तार यांचा बीड येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिता का? अशी विचारणा केली होती. यावरून देखील त्यांच्यावर टीका झाली होती.

6. अब्दुल सत्तार यांच्यावर अनेकदा घोटाळ्याचे देखील आरोप झाले आहेत. आपल्या मतदारसंघात गोरगरीब लोकांच्या जमिनी लाटल्याचा देखील त्यांच्यावर आरोप झाला. तसेच, वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ शिवारातील ३७ एकर जमीन बेकायदेशीर वाटप केल्याप्रकरणात देखील सत्तार यांच्या नावाची चर्चा झाली आणि त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे सत्तार यांच्या याच वादग्रस्त भूमिकांमुळे मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Tulsi: घरात तुळशीचे रोप असेल तर, या गोष्टीची घ्या काळजी

Pune Accident: सुसाट पोर्शे कार, मद्यधुंद चालक अन् भयंकर अपघात! बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं; तरुण- तरुणी ठार

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT