Jitendra Awhad Controversial Statement: जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला पुरस्कार देऊ; हिंदू महासभेची घोषणा

Jitendra Awhad Controversial Statement On Lord Ram: जालन्यात याच वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हिंदू महासभा आक्रमक झालीये. आमदार आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, अशी घोषणा हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी केलीय.
Jitendra Awhad Controversial Statement
Jitendra Awhad Controversial StatementSaam TV
Published On

लक्ष्मण सोळुंके

Trending News:

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यात हिंदू महासभा आक्रमक झालीय. आमदार जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, अशी प्रतिक्रया हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी यांना व्यक्त केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jitendra Awhad Controversial Statement
Jitendra Awhad Statement : जितेंद्र आव्हाड पक्षात एकाकी; प्रभू श्रीरामाबद्दलच्या वक्तव्यामुळे अडचणीत वाढ

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध सर्वच स्तरातून करण्यात येतोय. जालन्यात याच वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हिंदू महासभा आक्रमक झालीये. आमदार आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, अशी घोषणा हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी केलीय.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बुलढाण्यातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुलढाण्यातील वरवट बकाल येथे भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मोठी घोषणाबाजी करण्यात आली. आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलिसांना ही धक्काबुक्की केली यावेळी जवळपास 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हासहमंत्री सुरेंद्र महाले यांचा शिर्डी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.

Jitendra Awhad Controversial Statement
Gurugram Crime News : दिव्या पाहुजा खून प्रकरणात हॉटेल मालकाचा धक्कादायक खुलासा, ब्लॅकमेल करत होती म्हणून...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com