ramdas kadam  Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Kadam : 'मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडावा लागतो, तरच...'; रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam Latest news : 'आम्ही मिठाई आणि पुष्कळ खोके दिले. मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडावा लागतो तर मंत्रिपद मिळते, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Ramdas Kadam News:

राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज शुक्रवारी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर मोठा गंभीर आरोप केला आहे. 'आम्ही मिठाई आणि पुष्कळ खोके दिले. मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडावा लागतो तर मंत्रिपद मिळते, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Latest Marathi News)

शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

रामदास कदम म्हणाले, 'शिवसेनेची वाटचाल काय असणार याबाबत चर्चा झाली. शिवसेना प्रमुख यांच्यासोबत 55 वर्षे होतो. आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा सुपूत्र आदित्य ठाकरे यांचं वागणं बरं नाही. त्यांचे टोमणे सुरु आहेत. दिवा विझविण्याच्या आधी फडफडतो असे सुरु आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'सकाळी उठल्यापासून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून आत्मपरीक्षण करावे. माझं आणि दिवाकर रावते यांचं पद काढले आणि पुत्राला दिलं. असे बाळासाहेब ठाकरेंनी कधी केले नाही, असेही ते म्हणाले.

'आम्ही आता एकनाथ शिंदे यांचा पर्याय स्वीकाराला आहे. लोकसभा आणि विधानसभा आम्ही जिंकूच, आम्ही आणखी मेहनत घेऊ. जिथं ठाकरे यांची सभा होईल तिथे दुसऱ्या दिवशी माझी सभा होईल. उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे. भ्रष्टाचार बाहेर येईल, असाही गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT