रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे हे वाघ नसून लांडगा असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप कदमांनी केले.
उद्धव ठाकरे हे वाघ नाही तर लांडगा असून ते काय आहेत, हे महाराष्ट्राला हळूहळू कळेल. असं म्हणत रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिंदे गटाच्या शिवसेना मेळाव्यात रामदास कदमांनीबाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केला होता, आता कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय.माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण मी सांगणार नाही, जर वेळ पडली तर मी सोडणार सुद्धा नाही, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय.
उद्धव ठाकरेंनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस ठेवला होता. त्यादरम्यान त्यांच्या हाताचे ठसे त्यांनी घेतले. ते का घेण्यात आले. याचे कारण उद्धव ठाकरेंनी सांगावं, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणालेत.
गुरुवारी नेस्को सेंटरमध्ये झालेल्या शिंदे गट शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात रामदास कदम यांनी खळबळजनक दावा करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर रामदास कदम यांच्यावर टीका केली जात होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांना सडकून प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर रामज कदम यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं.
उद्धव ठाकरे हे कपटी आहेत, हे सर्वांना कळेल. हिंमत असेल तर ठाकरेंनी सांगावं, असं घडलं नाही ते. मी काल मेळाव्यात ओघा ओघात बोलून गेलो, पण ते वास्तव आहे, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी खरं सांगवं त्यासाठी भले माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा,असेही रामदास कदम म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात होता. हाताचे ठसे का घेण्यात आले होते, हे खरं आहे. उद्धव ठाकरेंनी दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या मृतदेहाचा छळ केला.दोन दिवस मातोश्रीत कोणालाही एन्ट्री नव्हती. बाळासाहेबांचा मृत्यू झाला होता तेव्हा शरद पवार आले होते, त्यांनाही वरच्या मजल्यावर जाऊ दिलं नव्हतं. त्यावेळी अरे मिलिंद, बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय? असं शरद पवार म्हणाले होते.
बाळासाहेब यांच्या निधनाला एक दशक होत आलंय. पण आता का तो मुद्दा उपस्थिक केला जातोय. त्यावर बोलणं म्हणजे हे बेईमानी आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता. त्याला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, भुंकणाऱ्या कुत्र्याकडे मी लक्ष देत नाही. मी घाबरणारा नाहीये. इतके दिवस मी बोललो नव्हतो , काल ओघात बोललो.
मी तोंड उघडलं तर मातोश्री कापेल, हादरा बसेल. उद्धव ठाकरेंनी पाप केलंय. उशिरा का होऊना पण कळू द्या. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. बदलणार नाही. काल जे बोललोय ते चूक नाही तर वास्तव आहे. तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेतले का नाही, हे त्यांनी सांगवं.
तुमचा मुलगा आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव ठाकरेंनी सांगावं. जर ठसे घेतले असेल तर ते का घेतले? दरम्यान आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण आपण सांगणार नाही, जर वेळ पडली तर मी सोडणार सुद्धा नाही, असा इशाराही रामदास कदम यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.