Nagpur Winter Session Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनात सरकारसमोर मोठं आव्हान; नागपुरात पहिल्याच दिवशी ३ मोर्चे, १७ आंदोलने

Nagpur Hiwali Adhiveshan 2023 : सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिव्यांगांच्या शाळेसाठी अनुदान, समग्र कर्मचाऱ्याने नोकरित कायम करावे, सफाई मजदूर काँग्रेसचे असे तीन मोर्चे विधान भवनात धडकणार आहेत.

प्रविण वाकचौरे

Nagpur News :

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. विविध मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे विरोधत तर दुसरीकडे आंदोलनांमुळे सरकारला हे अधिवेशन जड जाण्याची शक्यता आहे.

नागपूरच्या विधिमंडळावर निघणारे मोर्चे नेहमी चर्चेचा विषय राहतात. यंदा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मोर्चे आणि १७ आंदोलने होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी यशवंत स्टेडियमवर विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 17 धरणे आंदोलन होणार आहेत. तसेच 5 साखळी उपोषण, 4 उपोषण आणि एक ठिय्या आंदोलन होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासोबतच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिव्यांगांच्या शाळेसाठी अनुदान, समग्र कर्मचाऱ्याने नोकरित कायम करावे, सफाई मजदूर काँग्रेसचे असे तीन मोर्चे विधान भवनात धडकणार आहेत. (Latest News Update)

संपू्र्ण हिवाळी अधिवेशनाच्या काळात जवळपास १०० मोर्चे विधीमंडळावर धडकण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने आतापर्यंता ४८ मोर्च्यांना परवानगी दिली आहे. तर ७० मोर्चे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. यात मोर्च्यासाठी सुरुवातीचे ठिकाण आणि मोर्चाचे शेवटचे स्थळ यासह नियम अटीशर्तीसह परवानगी दिली जात आहे.

अधिवेशन काळात सुमारे 11 हजार पोलिसांचा बंदोबस्त

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी सुमारे 11 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी हे नागपुरात बंदोबस्तासाठी आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारी एसआरपी, होमगार्ड यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. चार ते पाच हजार पोलीस कर्मचारी हे शहर पोलीस दलातील असून सुमारे 6 हजार कर्मचारी हे राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT