Ramdas Athwale : मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी वाद मिटवावा, अन्यथा मला यावं लागेल : रामदास आठवले

Ramdas Athwale on Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात सर्व समाजात सहिष्णुता आहे. वाद होणे योग्य नाही. जरांगे आणि भुजबळ यांनी वाद मिटवावा नाहीतर मला येऊन त्यांचा वाद मिटवावा लागेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
Ramdas Athwale on Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal
Ramdas Athwale on Manoj Jarange Vs Chhagan BhujbalSaam TV
Published On

Mumbai News :

मराठा समाजाने आता आहे त्या ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण मागू नये, तर ओबीसीमध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून ओबीसी म्हणूनच आरक्षण घ्यावे. मराठा समाजातील ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे, अशा गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि त्या मराठा आरक्षण मागणीला आमचा पाठिंबा आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी वाद मिटवला पाहिजे. महाराष्ट्रात सर्व समाजात सहिष्णुता आहे. वाद होणे योग्य नाही. जरांगे आणि भुजबळ यांनी वाद मिटवावा नाहीतर मला येऊन त्यांचा वाद मिटवावा लागेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाणदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते. (Latest News Update)

Ramdas Athwale on Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal
Nagpur Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनात सरकारसमोर मोठं आव्हान; नागपुरात पहिल्याच दिवशी ३ मोर्चे, १७ आंदोलने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहरू मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते. त्याकाळात त्यांनी काँग्रेससोबत युती केली असली तरी, ‘मी कणखर आहे काँग्रेसच्या नदीत ढेकळासारखा विरघळणार नाही’, असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा शिष्य आहे. मोदींसोबत असलो तरी माझ्या हाती निळा झेंडा आहे. मी कणखर असून ढेकळासारखा विरघळणार नाही.

Ramdas Athwale on Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal
Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; कुणाला मिळणार संधी?

लोकसभेत आरपीआयचा एकही खासदार नाही तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आहे. मी संसदेत ‘जयभीम’चा नारा बुलंद केला आहे, असं रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं. शेतकाऱ्यांचे कर्ज माफ केले तसे मागसावर्गीयांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com