Maharashtra Hiwali Adhiveshan : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपणार; हिवाळी अधिवेशन कोणत्या मुद्द्यांवर गाजणार?

Nagpur Winter Session 2023 : विविध मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, यावर एक नजर टाकूया.
Winter Session 2023
Winter Session 2023Saam TV
Published On

Maharashtra Winter Session 2023 :

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरातून सुरुवात होत आहे. पुढील दोन आठवडे हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर विरोधात आणि सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडेही अवघ्या राज्याचं लक्ष आहे. विविध मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, यावर एक नजर टाकूया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Winter Session 2023
Maharashtra Winter Session 2023: हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने येणार; राज्याचे प्रश्न सुटणार?

हिवाळी अधिवेशन या मुद्यांवर गाजणार

राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळी जिल्हे जरी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात १००% शेतकऱ्यापर्यंत अद्याप मदत पोहचली नसल्याने विरोधक हा विषय उचलून धरतील. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही राज्यातील अनेक जिल्ह्यात आहे. यावरुनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Latest News)

मराठा व धनगर आरक्षणावरून हिवाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा आणि रुग्णालयातील अधीक्षकांचा सहभाग समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून विरोधक सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

Winter Session 2023
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार? 'सुप्रीम' सुनावणी पूर्ण; कोर्टात नेमकं काय घडलं?

कंत्राटी नोकर भरतीच्या निर्णयाचा प्रश्न उपस्थित करत विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. तसेच वाढती बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित करत आरोग्य विभाग, पोलीस भरती केव्हा होणार याचा जाब विरोधक सरकारला विचारण्याची शक्यता आहे.

महिलावरील वाढत्या अत्याचारामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले. बालकांचे लैगिक शोषण यावरून विरोधक आक्रमक भूमिका मांडतील.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात शासनाकडून मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यात केंद्रानेही मदत करण्याची मागणी करत हा मुद्दा विरोधक आक्रमकरित्या अधिवेशनात मांडतील.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची मलिका ही सुरूच आहे. मात्र उपाययोजना होताना दिसत नसल्याने समृद्धी महामार्गावरील अपघाताचा विषय देखील गाजण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com