shahaji bapu patil and uddhav thackeray
shahaji bapu patil and uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

दसरा मेळाव्याला शिवसेनेचे काही आमदार शिंदे गटात सामील होणार ? शहाजी बापू पाटील यांचा दावा

विजय पाटील

Shahaji Bapu Patil News : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. या बंडखोर आमदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर पुन्हा शिवसेनेतील काही आमदार दसरा मेळाव्याला शिंदे गटात सामील होणार असा दावा आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शहाजी बापू पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी शरद पवारांच्या राजकारणावर आणि शिवसेनेवर भाष्य केलं. शहाजी बापू पाटील म्हणाले, 'राजकारणात शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर , इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते'. 'तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती. हे सुद्धा विसरता येणार नाही', असेही शहाजी बापू यांनी सांगितले.

'आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही. मात्र, विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत. राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत', असे शहाजी बापू म्हणाले. तर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आणखी काही आमदार दसरा मेळाव्याच्या शिंदे गटात येण्याची शक्यता आहे, असा दावा शहाजी बापू यांनी केला आहे.

'ठाकरे आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना कामे झाली नाहीत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे असताना होत आहेत, असेही शहाजी बापू पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

SCROLL FOR NEXT