भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर विश्वजित कदमांचे स्पष्टीकरण, म्हणाले, 'महाराष्ट्रात पुन्हा...'

भाजपमध्ये गेलेल्यांची थप्पी लागली आहे. काहीजण तिकडची सत्ता आली म्हणून तिकडे गेले.
Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSaam TV
Published On

सांगली: काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना विश्वजित कदम यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असून, महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपले सरकार येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

विश्वजित कदम आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली असून कदम आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याच सर्व पार्श्वभूमीवर आता कदम यांनी आपण काँग्रेस (Congress) सोडणार नसल्याचं सांगितलं आहे.

अशातच आज काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी देखील कॉंग्रेसचा विचार,नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी आता विश्वजितवर आहे. विश्वजित कदम यांचा भविष्यकाळ कॉंग्रेसमध्ये घडेल तो दुसरीकडे कुठेच घडणार नाही असंही ते आज म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

थोरात पुढे बोलताना म्हणाले, 'विश्वजित कदम यांना सांभाळून घ्यावे लागेल असं आम्हाला वाटत होतं. मात्र, आता विश्वजितचं सगळ्यांना सांभाळतोय, गडी एकदम बिलंदर आहे. पुढच्या काळात कदमांना चांगले नेतृत्व करायला मिळणार आहे. कॉंग्रेसचा विचार,नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

त्यांचा भविष्यकाळ कॉंग्रेसमध्येच घडेल तो दुसरीकडे कुठंच घडणार नाही. भाजपमध्ये गेलेल्यांची थप्पी लागली आहे. काहीजण तिकडची सत्ता आली म्हणून तिकडे गेले. मात्र, नंतर पक्षाच्या मिटींगमध्ये ती लोकं मागच्या ओळीत मोबाइल पाहत खाली माना घालून बसलेली दिसतात. कॉंग्रेस पक्षासाठी अडचणीचा काळ आहे, पण अडचणीचा काळ येत असतो आणि जात असतो. पण या अडचणीच्या काळातच तावून-सुलाखून नेतृत्व तयार होत असतं असंही ते म्हणाले.

तर काही मीडियाचा माझ्यावर एवढा का फोकस आहे मला माहित नाही. मी कुठल्या ही वेगळ्या भूमिकेत नाही. या सर्व अफवा आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. मी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्टीकरण विश्वजित कदम यांनी आज सांगलीच्या अंकलखोप मध्ये दिलं. तसंच महाराष्ट्र मध्ये तीन सरकारचे सरकार बनलं. अडीच वर्षेाच्या कार्यकाळात मला खूप काही शिकायला मिळालं. पण गेल्या महिन्यात अपघाताने आपलं सरकार गेले पण पुन्हा आपले सरकार येईल असंही कदम म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com