thane diva latest crime news Saam Tv
महाराष्ट्र

हातात तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

Diva Crime News : दहिसर ठाकुरपाडा परिसरात दहशत माजविणाऱ्या ४ जणांच्या मुसक्या शीळ डायघर पोलिसांनी आवळल्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवा : कल्याण (kalyan) ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि १४ गावातील दहिसर ठाकुरपाडा परिसरात दहशत माजविणाऱ्या ४ जणांच्या मुसक्या शीळ डायघर पोलिसांनी आवळल्या आहेत. हातात तलवारी (Sword) व धारदार शस्त्र घेत रस्त्यात दिसेल त्याला मारहाण करीत हे तरुण दहशत माजवीत होते. ही माहिती ग्रामस्थ यांनी दिल्यानंतर  जावेद सलीम शेख उर्फ डीजे (वय ३९), दिलावर उर्फ रुबेल फरीद शेख (वय २७), शाहिद नासीर शेख (वय २२) आणि साद अहमद उर्फ सोनू नासीर शेख (वय २४) अशी अटक केली आहे. तर मारिया जावेद खान याचा पोलीस शोध घेत आहेत. (thane diva latest crime news) 

हे देखील पाहा -

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि १४ गावातील दहिसर ठाकुरपाडा परिसरात सर्व आरोपी राहण्यास आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 3 च्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवून गावात हे आरोपी सार्वजनिक ठिकाणी हातात तलवारी व धारदार हत्यार घेऊन फिरत होते. दिसेल त्याला मारहाण करत, बंद घरांच्या दरवाज्यावर शस्त्रानी बडवावडव करीत, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करीत होते. याची माहिती ग्रामस्थांनी शीळ डायघर पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सदर प्रकरणी 5 जणांविरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मारियाचा शोध घेतला जात असल्याची माहिती शीळ डायघर पोलीसांनी यांनी दिली.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमक

नांदेडच्या लॉजमध्ये आढळला शिक्षकाचा मृतदेह; हत्या ती आत्महत्या? नक्की घडलं काय?

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीची तारखी ठरली, उद्धव ठाकरे-राहुल गांधींमध्ये चर्चा; दिल्लीमध्ये राजकारण तापणार

Breaking : घराला बॉम्बने उडवून टाकू! मित्राचा फोन घेतला अन् केंद्रीय मंत्र्याला धमकी दिली, नागपुरात खळबळ

Chawli Rassa Bhaji Recipe : चवळीला द्या मालवणी तडका, बनवा झणझणीत रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT