असा झाला 'त्या' तरुणीच्या खुनाचा उलगडा; सहा दिवसानंतर आरोपी गजाआड

धडगाव तालुक्यातील कुंडल येथे तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
Nandurbar crime update
Nandurbar crime updatesaam tv news
Published On

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील कुंडल येथे एका तरुणीचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली होती. ललिता पाडवी असं हत्या झालेलया तरुणीचं नाव आहे. तरुणीचा मृतदेह हरणखुरी-सोमाना परिसरात एका पुलाखाली आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दोन दिवसांनंतर मृतदेह (dead body) कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी (Police) तपासाची सूत्र वेगानं फिरवली. त्यामुळे सहा दिवसानंतर ललिताच्या खूनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी (culprit arrested) आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मनोज भिमसिंग वळवी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

Nandurbar crime update
शिवसेनेच्या सभेत विरोधकांचा समाचारच नाही घेणार, तर...; खासदार सावंत यांनी दिला इशारा

याबाबत सविस्तर वृत्त असं की, नंदुरबारचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत धडगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं तपास सुरू केला होता. पोलिसांनी ललिताच्या मोबाईलचे सीडीआरही तपासले. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. यातील एका संशयीत आरोपीचे ललितासोबत प्रेमसंबंध असल्याचंही समोर आलं होतं.

परंतु, त्या संशयीत तरुणाने ललिताचा खून केला नसल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. त्यानंतर पोलिसांना या खूनाप्रकरणी गुप्त माहिती मिळाली.मुंदलवड येथील मनोज भिमसिंग वळवी या इसमाशी खूनाचे धागेदोरे जुळत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. त्यानंतर आरोपी मनोजला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By- Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com