Maharashtra Government  saam tv
महाराष्ट्र

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शेतरस्ते अडवणाऱ्यांचे आधार कार्ड आणि शेतकरी आयडी ५ वर्षांसाठी ब्लॉक होणार. तसेच सरकारी योजनांचा लाभही बंद केला जाणार आहे. नवीन जीआरनुसार कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

Ganesh Kavade

Maharashtra farm road blocking penalty rules : राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्या सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. आता जर कुणी शेतरस्ता अडवला तर सरकारी योजनेचा लाभ बंद होणार आहे. त्याशिवाय फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. राज्य सरकारकडून यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' सुरू केली आहे.

'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना'च्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी आज नवीन सुधारित जीआर जारी करण्यात आला आहे. या नवीन निर्णयामुळे आता शेतरस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे,नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंडच होणार नाही, तर त्यांना पुढील ५ वर्षांसाठी सरकारच्या सर्व योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाई

गाव नकाशावर असलेल्या किंवा सरकारी जागेतील रस्त्यांवर कोणी अतिक्रमण केले असेल, तर तहसीलदार त्यांना ७ दिवसांत अतिक्रमण काढण्याची नोटीस देतील. नोटीसनंतरही जर संबंधित व्यक्तीने स्वतःहून अतिक्रमण काढले नाही, तर तहसीलदार स्वतः ते अतिक्रमण काढून टाकेल. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, जे लोक रस्त्याचे नुकसान करतील किंवा रस्ता अडवतील, त्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी (Farmer ID) ५ वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. त्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ किंवा कोणतीही शासकीय मदत मिळण्यास ५ वर्षांसाठी अपात्र ठरतील.

'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना'नेसाठी कोणतेही सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही. जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील, त्यांना नोंदणीकृत दानपत्र (Gift Deed) किंवा हक्कसोड पत्र करून देणे अनिवार्य आहे. हे दानपत्र शासनाच्या नावे होत असल्याने, त्यावर लागणारे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी फी पूर्णपणे माफ असेल. या जमिनीची नोंद संबंधित शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर घेतली जाईल आणि एकदा दिलेली जमीन शेतकऱ्याला पुन्हा परत मागता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Election:विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 नेत्यांमध्ये रस्सीखेच, एकनाथ शिंदे कोणाला देणार संधी?

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं शिक्षण किती?

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Bhooth Bangla OTT : रिलीज होऊन एक दिवस होत नाही तोच ओटीटीवर येणार अक्षय कुमारचा चित्रपट? 'भूत बंगला'बाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT