Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Shetkari Sangh : पालकमंत्री, जिल्हाधिका-यांवर शेतकरी सहकारी संघाच्या सभासदांचा राेष, जागा ताब्यात घेतल्याने काढला माेर्चा

नवरात्राेत्सवात या मंडपाचा भाविकांसाठी उपयोग करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संघाची जागा जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच ताब्यात घेतल्याने सभासद आक्रमक झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णया विरोधात सभासदांनी माेर्चा काढला आहे. (Maharashtra News)

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महालक्ष्मी मंदिरा शेजारी असणाऱ्या शेतकरी सहकारी संघाची इमारत नुकतीच ताब्यात घेतलेली आहे. नवरात्राेत्सवात या मंडपाचा भाविकांसाठी उपयोग करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

या निर्णयास शेतकरी सहकारी संघाने कडाडून विरोध केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीमागून जागा हडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकरी सहकारी संघाने काेणाचेही नाव ने घेता केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत सुट्टीच्या दिवशी शेतकरी सहकारी संघ ताब्यात घेतल्याचा आरोप ही शेतकरी संघाने केला. दरम्यान आज शेतकरी सहकारी संघाच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी माेर्चेकरांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात घाेषणाबाजी केली. या माेर्चातील काही शेतक-यांनी जमीन हडप करण्याचा डाव असल्याचा आराेप पालकमंत्र्यांवर केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Kunbi Maratha : सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

iPhone 17 सीरीज लाँच; भारतात किंमत किती? फिचर्स आणि कॅमेराबद्दल सर्वकाही जाणून घ्या

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT