Jayant Patil News Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil News: नको त्या आणि बेईमानी करणाऱ्या लोकांना मोठं करू नका; जयंत पाटील यांची शरद पवार यांना 'रिक्वेस्ट'

Jayant Patil News: 'नको त्या आणि बेईमानी करणाऱ्या लोकांना मोठं करू नका, अशी विनंती शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

Vishal Gangurde

विनय म्हात्रे

Jayant Patil News:

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षफुटीनंतर साधारण चाळीस आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. तर काही खासदारांनीही शरद पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादीच्या फुटीवर शेकाप नेते, आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांना एक विनंती केली आहे. 'नको त्या आणि बेईमानी करणाऱ्या लोकांना मोठं करू नका, अशी विनंती शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. (Latest Marathi News)

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटन समारंभ रायगडमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमाला 'इंडिया' आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाआधी शेकाप नेते जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेकाप नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना टोला लगावला. 'श्रीवर्धन हे बॅ. ए आर अंतुलेचं बालेकिल्ला आहे. दुसरं कोणाचा नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना टोला लगावला.

जयंत पाटील पुढे म्हणाले, 'रायगडचा इतिहास आणि जिल्ह्यात बॅ. ए आर अंतुले यांनी केलेलं काम नव्या पिढीला समजण्यासाठी या श्रीवर्धनमध्ये शाखा उघडण्यात आली आहे. आम्ही अनंत गीते यांच्या बाबतीत मोठी चूक केली'.

'नको त्या लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका. उगाच कोणाला मोठं करू नका. शरद पवार यांनी मोठं केलं हे अनेक लोकं विसरून जातात. आता नेते मोठे करताना काळजी घ्या. बेईमानी करणाऱ्यांना मोठं करू नका, अशी विनंती जयंत पाटील यांनी शरद पवारांना केली.

'रायगडमध्ये बॅ.ए. आर अंतुलेचं वैभव पुन्हा उभं केलं जाईल. शरद पवारांनी काजू आणि आंब्याला अनुदान दिल्याने कोकण हिरवंगार दिसतोय,असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT