महाराष्ट्र

Raigad Politics: रायगडमधील राजकारण फिरलं; जयंत पाटलांना धक्का, भाऊ सोडणार भावाची साथ

Raigad Politics: पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय. शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Bharat Jadhav

रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शेकापला मोठा धक्का बसणार आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेनेनंतर भाजपनेही कोकणाकडे मोर्चा वळवत तेथे पक्षाची मोर्चेबांधणी सुरू केलीय आहे. त्याचा पहिला दणका शेतकरी कामगार पक्षाला बसलाय. शेतकरी कामगार पक्षातील नाराज माजी आमदार पंडित पाटील यांना गळ घालत भाजपने मोठा धक्का देत जयंत पाटील यांचे घर फोडलंय. पक्ष नेतृत्त्वाने अविश्वास दाखवल्यामुळे नाराज असलेले जयंत पाटील यांचे भाऊ पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंडित पाटील १६ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

शेकापला का ठोकला रामराम

पक्षाने अविश्वास दाखवल्याने पंडित पाटील नाराज झाले आहेत. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर त्यांनी एका व्हिडिओतून प्रतिक्रिया दिलीय. ज्या शेतकरी कामगार पक्षासाठी ४० वर्ष वेळ दिला. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेतृत्त्वाने अविश्वास दाखवला. निंदानालस्ती केली, त्याचं आपल्याला दु: ख झाल्याचं पंडित पाटील म्हणालेत.पंडित पाटील यांनी शेकापकडे निवडणुकीचे तिकीट मागितले होते, परंतु पक्ष नेतृत्त्वाकडून तिकीट नाकारण्यात आले त्यामुळे पंडित पाटील नाराज झालेत.

जर आपल्याला तिकीटचा निर्णय घेताना विश्वासात घेतलं असतं तर आपण उमेदवारीसाठी थांबलो असतो, असं पंडित पाटील म्हणालेत. आपण सरपंच, जिल्हा परिषदेत निवडून आलो, आमदार म्हणून जनतेतून निवडणून आलो. अशा नेत्याला अशी वागणूक दिली ही असह्य झाली, त्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं पंडित पाटील म्हणालेत.

दरम्यान पंडित पाटील यांच्याबरोबरच माजी मंत्री मीनाक्षी दे पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील हेही भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शेकापचे सर्वेसर्वा असलेले जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील हेच पक्षांतर करणार असल्याने हा मोठा राजकीय भूकंप रायगडच्या राजकारणात घडणार असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT