buldhana, shegoan , ration rice, bjp , police saam tv
महाराष्ट्र

BJP : रेशनच्या तांदळाची बेकायदेशीर वाहतुक; भाजप नेत्यासह एकावर गुन्हा

पाेलिसांनी बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल केला.

संजय जाधव

Shegoan : रेशनच्या तांदळची बेकायदेशिररित्या वाहतुक केल्याने शेगाव पाेलिसांनी (police) दाेघांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एक जण भाजपाचा (bjp) नेता असल्याची माहिती समाेर येत आहे. या प्रकरणाचा पाेलिस कसून तपास करीत आहेत. (buldhana latest marathi news)

शेगाव पोलिसांनी आठवड्यापुर्वी रात्रीच्या सुमारास सुमारे ३० क्विंटल रेशनचा तांदूळ अवैध वाहतूक होत असताना पकडला. त्यानंतर संबंधित तांदुळ हा पाेलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवला. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी तसेच अधिक तपास करण्यासाठी पाेलिसांना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचा अहवाल आवश्यक होता.

त्याबाबत पोलिसांनी शेगाव तहसीलदार यांना पत्र देऊन अहवाल मागविला होता. मात्र पोलिसांना तहसील कार्यालयाकडून अहवाल मिळत नव्हता. दरम्यान प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मंगळवारी (ता. 20) सायंकाळी काही कागदपत्र पाेलिसांना मिळाली.

अखेर आठवड्याभरानंतर पोलिसांच्या ताब्यातील रेशनच्या तांदूळ प्रकरणी अहवाल मिळला. हा तांदूळ रेशनचाच असल्याचे अहवालात नमूद हाेते. त्यानूसार पाेलिसांनी बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अवैधरित्या रेशनचा तांदुळ वाहतुक करणारा वाहन चालक मोहम्मद इस्माईल मोहम्मद इकबाल (बाळापुर) आणि दीपक धमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी नितीन इंगोले हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT