Shegaon Kachori Railway Saam tv
महाराष्ट्र

Shegaon Kachori: शेगावची प्रसिद्ध कचोरी आता रेल्वेतही; रेल्वेने सुरू केले अनोखं ‘रेल्वे कोच रेस्टॉरंट’

शेगावची प्रसिद्ध कचोरी आता रेल्वेतही; रेल्वेने सुरू केले अनोखं ‘रेल्वे कोच रेस्टॉरंट’

संजय जाधव

बुलढाणा : शेगावची जगप्रसिद्ध कचोरी आता तुम्हाला रेल्वेतही मिळणार आहे. रेल्वे (Railway) विभागाच्या आयआरसीटीसी (IRCTC) विभागाने आता (Shegaon) शेगाव रेल्वे स्थानकात एक रेल्वे कोच चक्क रेस्टॉरंट म्हणून बनविलाय आणि या रेस्टॉरंटमध्ये आता लवकरच शेगावची प्रसिद्ध असलेली कचोरीचा आस्वाद आता तुम्हाला चोवीस तास घेता येणार आहे. (Breaking Marathi News)

मध्य रेल्वेचे शेगाव स्टेशन असून संत गजानन महाराजांची समाधी स्थळ शेगावातच आहे. शेगाव येथे दुसरी प्रसिद्ध गोष्ट म्हणजे येथील खुसखुशीत आणि चावदार कचोरी. अस सांगितले जात की १९५० मध्ये देशाची फाळणी झाली; त्यावेळी पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधून एक गृहस्थ शेगावात आले. ज्यांचे नाव तिरथराम करमचंद शर्मा होते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी त्याकाळी शेगाव रेल्वे स्थानकात काचोरी विकण्याचे काम सुरू केले. आज हीच कचोरी प्रसिद्ध झाली ती आपल्या चवीने. आता त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. नाव मात्र तेच... टी.आर.शर्मा...त्यांचे अनेक वंशज शेगावात आज काचोरीचा व्यवसाय करतात.

१ मेपासून सुरवात

१९५० सालापासून शेगावची ही प्रसिद्ध कचोरी रेल्वेत मिळत असे. पण गेल्या दहा ते बारा वर्षापासून रेल्वेत ही कचोरी विकण्यास मनाई झाली होती. मात्र आता हीच कचोरी नवीन ग्लॅमरस रुपात तुम्हाला मिळणार आहे. ती म्हणजे शेगाव रेल्वे स्थानकात नवीन सुरू होत असलेल्या "रेल्वे कोच रेस्टॉरंट" मध्ये! येत्या एक मे रोजी या रेल्वे कोच रेस्टॉरंटचे उद्‌घाटन होणार असून हा वातानुकूलित रेल्वे कोच नुसतं कोच नसून यात शेगावच्या कचोरी सोबत अस्सल वर्हाडी जेवणही मिळणार असून अगदी २४ तास ही सेवा सुरू असणार आहे. रेल्वेने सुरू केलेल्या या कोच रेस्टॉरंटमुळे शेगावात येणारे व कचोरी प्रेमी भाविकही खुश आहेत.

चोवीस तास उपलब्‍ध

बाहेरून जरी हा रेल्वेचा डबा वाटत असला तरी मात्र आतून ही एक रेस्टॉरंट असून सर्व सुविधा या कोच रेस्टॉरंटमध्ये आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच ही कोच रेस्टॉरंट शेगाव रेल्वे स्थानक बाहेर असलेल्या या रेल्वेच्या डब्यातील वातानुकूलित रेस्टॉरंटमध्ये बसून तुम्हाला शेगावची प्रसिद्ध कचोरी चाखायला मिळणार आहे आणि ती ही चोवीस तास.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT