shashank rao 
महाराष्ट्र

एसटी कर्मचारी चिंतेत; उपाेषणकर्ते शशांक राव रुग्णालयात दाखल

सरकारची सकारात्मक भुमिका दिसत नाही अशी खंत शशांक राव यांनी व्यक्त केली.

भारत नागणे

पंढरपूर shashank rao latest news : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी उपाेषणास बसलेल्या एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांची प्रकृती खालवली. यामुळे पाेलिसांनी राव यांना पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गेल्या महिन्याभरापासून राज्यभरातील एसटी कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या संपाला एसटी कामगार युनियनचे राज्य सरचिटणीस शशांक राव यांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शशांक राव यांचे विविध भागात उपोषण सुरू आहे. आज ते पंढरपुरात आले. येथे त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्य सरकार खाेट्या बातम्या पसरवून कर्मचा-यांच्या संपात फूट पाडत असल्याचे नमूद केले.

आज सायंकाळच्या सुमारास उपाेषणकर्त्या राव यांची प्रकृती ढासळली. पाेलिसांनी तातडीने त्यांना वाहनात घालून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सरकाराने एसटी कर्मचारी संपावर ताेडगा काढे पर्यंत आम्ही लढा सुरु ठेवणार असल्याचे राव यांनी यावेळी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT