मावळ्यांनाे! पाच दिवस रायगडावर प्रवेश बंदी; जाणून घ्या दिवस

पर्यटकांनी या बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
raigad fort
raigad fort

- राजेश भोस्तेकर

रायगड ramnath kovind latest news : छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची राजधानी रायगड (raigad) किल्ल्यास भेट देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या सहा डिसेंबरला येणार आहेत. यापुर्वी राष्ट्रपती सात डिसेंबरला येतील असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून सांगण्यात आले हाेते. राष्ट्रपतींच्या किल्ले रायगड भेटीची तारीख बदलली आहे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद हे किल्ले रायगडावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या दाै-या निमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर raigad fort नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

raigad fort
काली चरण महाराज भवानी मातेच्या दर्शनास; उदयनराजेंची उपस्थिती

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजेंनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांना किल्ले रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार राष्ट्रपतींनी केल्याचे सांगत भेटीची सात डिसेंबर अशी तारीख निश्चित केल्याची माहिती राजेंनी दिली हाेती. त्यानंतर राष्ट्रपती काेविंद यांच्या स्वागतासाठी किल्ल्यावर जाेरदार तयारी सुरु करण्यास प्रारंभ झाला. रायगड जिल्हा प्रशासन आणि रायगड विकास प्राधिकरण हे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या सहकार्याने किल्ले रायगड येथे राष्ट्रपतींच्या दाै-या निमित्त तयारी सुरु झाली आहे.

दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव तीन ते सात डिसेंबर रायगड पर्यटनासाठी बंद करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजुबाजूकडील परिसर हे तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रस्ता व नातेगाव ते पाचाड बाजुकडील रस्ता सुध्दा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com