Sharad Pawar On Shivsena Symbol Saam TV
महाराष्ट्र

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले, माझं मन सांगत होतं...

मी देखील अनेकवेळा अनेक चिन्हांवरती निवडणुका लढविल्या आहेत, चिन्हाचा काहीही फरक पडत नाही - पवार

डॉ. माधव सावरगावे

मुंबई: शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हावर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी दावा केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्ष चिन्हाबाबत काल मोठा निर्णय दिला त्यानुसार आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावं दोन्ही गट येऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत वापरु शकणार नाहीत असा मोठा निर्णय आयोगाने दिल्यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. (Andheri East Assembly by-election)

आयोगाच्या याच (Central Election Commission) निर्णयावर आता आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, हे होणार याची मला खात्री होती, असं काही घडेल असं माझं मन सांगत होतं. तसंच योग्य निर्णय दिले जातील याची खात्री नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

पाहा व्हिडीओ -

तर आपण देखील अनेकवेळा अनेक चिन्हांवरती निवडणुका लढविल्या आहेत. चिन्हाचा काही फरक पडत नाही, शेवटी जनता सर्व काही ठरवते असंही ते म्हणाले. तसंच या सर्व परिस्थित आता शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असंही पवार म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT